महाराष्ट्र

धनगर समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा

 

**पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त धनगर समाजाचा १० वा वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न**

सोलापूर, : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी सोलापुरमध्ये धनगर समाजाचा १० वा वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. राजमाता सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने हा भव्य कार्यक्रम सुंदर मल्टीपर्पज हॉल, नेहरूनगर, विजयापूर रोड, सोलापूर येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडला.

मेळाव्याचे उद्घाटन ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वधू-वर स्मरणिकेचे प्रकाशनही प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले.

राजमाता सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक रविंद्र नागणकेरी, अध्यक्ष-सुहास गडदे, उपाध्यक्ष-श्रीकांत मिरगाळे, सचिव-सचिन लांडगे, खजिनदार-रामचंद्र धर्मसाले तसेच संचालक आणि २०२६ कार्याध्यक्ष उदयकुमार ठेंगले, उपाध्यक्ष आत्माराम देवडे, सन्माननीय सदस्य भिमाशंकर काळे, सुनिल सलगर, भाऊसाहेब चोरमले, सदाशिव व्हनमाने, सौ प्रा. मुक्ता तरळगट्टी, प्रा. सौ. वासंती पांढरे, श्रीमती विमल सापटणेकर, अशोक नरुटे, दिलावर शेख, जितेंद्र गुरव व इतर मान्यवर/सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

कार्याध्यक्षपदी २०२७ साठी रमेश बंदिछोडे यांची तर उपाध्यक्षपदी माणिकराव घोडके (अक्कलकोट) यांची निवड करण्यात आली. पुढील मेळाव्याची तारीख ३०/०५/२०२७ निश्चित करण्यात आली.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील धनगर समाजातील इच्छुक वधू-वरांचे एकूण ६७८ परिचय पत्र पुस्तिकाचे वितरण करण्यात आले. पालकांची अंदाजे २२०० जण सहभागी होते, अशी माहिती संयोजक तथा संस्थापक रविंद्र नागणकेरी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button