सोलापूर

शिव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून गॅस दरवाढीला विरोध करण्यासाठी चुल पेटवुन आंदोलन

 

शिव सेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून गॅस दरवाढीला विरोध करण्यासाठी चुल पेटवुन आंदोलन करण्यात आले
         शिव सेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सौ सुषमा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाल चुल पेटवुन व भाकरी भाजुन आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जिल्हा परिषद घोषणाने दणाणून सोडला होता. सरकारच्या विरोधात यावेळी सर्व पदाधिकारी परखड भूमिका मांडत विरोध दर्शविला.
      यावेळी शिव सेना सोलापूर लोकसभा संघटक संजय पौळ, जिल्हा प्रमुख प्रताप चौहाण व शरणराज केंगनाळकर, तसेच महानगर प्रमुख महेश धाराशिवकर, महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगल थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिव सेना शहर व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत चुल पेटवुन व भाकरी भाजुन आंदोलन करण्यात आले व भाषण करून मत व्यक्त केले.
     यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. महिला महिला आघाडीकडून चूल पेटून तयार झालेले भाकऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेना महिला आघाडी कडून पाठवण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारने लवकरात लवकर गॅसचे दर कमी करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे.
   यावेळी दत्ता गणेशकर, खंडू सलगरकर, राजाभाऊ कुसेकर, बाबू राठोड, सदाशिव सलगर, शिवा माळी, सुशील उपलप, तुषार खंदारे, कृष्णा सुरवसे, संदीप बेळमकर, आबा सावंत, महमद मुलानी, राकेश माळकोटे, दिनेश चव्हाण, इब्राहिम फिरजादे, विश्वजीत चौगुले, जीवन जाधव, महेश पवार, पंकज गजाकोश, अनिल जाधव, योगेश धनिवाले, योगेश सलगर, अभिमन्यू यादव, सचिन घोडके, मनोज कामेगावकर , प्रकाश काशीद,स्वाती रुपनर, प्रभावती यलगुंडे, विद्या घोडके, अंबू भंडारे, नारम्मा कुजीकर, नागेश सोलनकर, अनिल ननवरे, समर्थ गायकवाड, आदी शिव सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button