सोलापूर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिकण्याचा, जगण्याचा, समानतेचा आणि समतेचा संदेश दिला : ज्ञानेश्वर महाराज जळगावकर

पंढरीत विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने विविध मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिकण्याचा, जगण्याचा, समानतेचा आणि समतेचा संदेश दिला : ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर

पंढरपूर/ प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिकण्याचा, जगण्याचा, समानतेचा आणि समतेचा संदेश दिला. बाबासाहेबांच्या घटनेनुसार देशाची वाटचाल सुरू आहे. बाबासाहेबांच्या मुखपत्रात संतांची वचने आहेत. यावरून त्यांच्यावरील संतांचा प्रभाव दिसून येतो. समाजासाठी जीवन जगून देशासाठी कार्य करणारे महापुरुष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान असे कार्य आहे. असे उद्‌गार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी काढले.
ते महाराष्ट्र शासन समाजभुषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्यावतीने गतवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वी जयंती महोत्सवानिमित्त राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा शिवतीर्थ येथील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की गतवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचबरोबर समाजातील सर्व घटकांना काम करण्याची उमेद आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव केला जातो. त्याबद्दल प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी कौतुक केले.
याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, अनिल सावंत, पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके, डीव्हीपी उद्योग समूहाचे अमर पाटील, मनसे नेते दिलीप धोत्रे, पंढरपूर पंचायत समितीचे सभापती शुभम आगवणे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, पंचायत समिती सदस्य सावली बंगाळे, माजी नगराध्यक्ष उज्वलाताई भालेराव, समाधान काळे, डॉ. बी.पी रोंगे, नगरसेवक ओंकार जोशी, सौ.राजश्री सर्वगोड उपस्थित होते.
यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पंढरपूर शहराचे नावलौकिक करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कु.अजिंक्या डि.राज सर्वगोड यांनी तीन भाषेमध्ये भाषण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा मा. नगरसेवक डि. राज सर्वगोड, प्रतिष्ठानचे सचिव अनिल ननवरे सर, नितीन काळे, जयंती समिती अध्यक्ष श्रीकांत चंदनशिव (सर), सचिव ज्ञानेश्वर कांबळे(सर), विलास जगधने सर, प्रा.सुदाम गायकवाड सर, संजय घोडके सर, प्रतिक कुंभारे, अजिंक्य देवमारे, मंजुळा धोडमिसे, सतीश खडके, प्रभाकर गायकवाड, अनंत थोरात, संजय कबाडे, आशाताई बागल, वंदना कसबे, पद्माकर सर्वगोड, अनिता आसबे, नागेश कांबळे, समाधान गिडड्‌े, रामदास नागटिळक , प्रविण नागणे, अपराजित सर्वगोड, विनोद धुमाळ, आदम बागवान, बंटी वाघ, विशाल आर्वे, रेहाना आत्तार, शरिफा पठाण, विकी कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त गतवर्षीप्रमाणे प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले.
यामध्ये प्रबुध्द विधिज्ञ’ पुरस्कार डॉ. सिद्धेश्वर चव्हाण, महर्षि वाल्मिकी शौर्यरत्न’ पुरस्कार निलेश माने, वर्धमान महावीर अहिंसारत्न’ पुरस्कार संजय शहा , राष्ट्रसंत रोहिदास महाराज प्रबोधनरत्न’ पुरस्कार डॉ. उद्धव रसाळे, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासनरत्न’ पुरस्कार सुधाकर धाईंजे, महाराज सयाजीराव गायकवाड सहकार रत्न पुरस्कार श्रीनिवास तीर्थ, राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्योगरत्न’ पुरस्कार करुणा जनार्दन शिवशरण, महात्मा बसवेश्वर समाजभूषण’ पुरस्कार डॉ. श्रेया माशाळ, राष्ट्रपिता महात्मा फुले समाजरत्न’ पुरस्कार लंकेश बोराडे, सुजित परांडे, शशिकांत ताठे, रवींद्र इंगोले, हरिराम पाटील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणभूषण’ पुरस्कार संगीता गौडदाब, अंकुश हाके, महादेव लवटे, राष्ट्रसंत गाडगे महाराज शिक्षणरत्न’ पुरस्कार मनोहर नारायणकर, डॉक्टर अमोल सोनवणे, बापू घोडके, उत्तम माळी, तानाजी बुरंगले, दादासाहेब करचे, नारायण लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे कामगाररत्न’ पुरस्कार सुधीर घोडके, डॉ. सी. के. बोले वैद्यकीयरत्न’ पुरस्कार डॉ. विजय सालविठ्ठल, डॉ. नीरज शहा, राजश्री शाहू महाराज क्रिडारत्न’ पुरस्कार संतोष गवळी, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार (प्रिंट मिडीया) नवनाथ पोरे, चंद्रकांत माने, शिल्पा आलमेलकर, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्येष्ठ पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) प्रशांत माळवदकर, सचिन कसबे, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर युवा पत्रकार’ पुरस्कार (प्रिंट मिडीया) नवनाथ खिलारे, संतोष रणदिवे, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर युवा पत्रकार’ पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक्स मिडीया) हुसेन नदाफ, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ पुरस्कार रामकृष्ण अघोर, राजू कांबळे, महाकवी वामनदादा कर्डक कलारत्न’ पुरस्कार कालिदास सोनवणे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न’ पुरस्कार स्वाती काळे, भारतरत्न मोक्षगुंडम सर विश्वेश्वरया स्थापत्यरत्न’ पुरस्कार महेश पटवर्धन, भारतरत्न डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान रत्न’ पुरस्कार सचिन बंगाळे, राजमाता जिजाऊ आदर्शमाता’ पुरस्कार जाई दवणे, माता रमाई आदर्श पत्नी’ पुरस्कार प्रणिताताई भालके, विर शिवा काशीद वीररत्न’ पुरस्कार तुकाराम चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार वसंतराव नेहतराव, विलास कुलकर्णी, गौतम राजाध्यक्ष फोटोग्राफररत्न’ पुरस्कार राहुल गोडसे, उत्कृष्ट कृतिशील महिला बचत गटास राज्यस्तरीय पुरस्कार रेवा महिला बचत गट, सौ.राधिका गडहिरे, रमाई महिला बचत गट सौ.साधना भाट, साईनाथ महिला बचत गट सौ. रेखा म्हमाणे, वसुंधरा राज्यस्तरीय पुरस्कार सुनील वाळूजकर, सोमनाथ होरणे, पंढरीरत्न पुरस्कार प्रणव परिचारक, विशेष सन्मान धनंजय राक्षे, विधूलता पांढरे, दिगंबर देवमारे, शिवानी लिंगे यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमास महिला व पुरूष बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन राजूभाई मुलाणी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button