सोलापुरात जय भारत माता सेवा समितीच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिन कार्यक्रम साजरा होणार

सोलापूर : जय भारत माता सेवा समिती (रजि.) नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थित सोलापुरात बुद्ध पौर्णिमा निमित्य भगवान गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विविध वाद्य समवेत देशभक्तीचा जयघोष करीत १ मे रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्यांची माहिती उद्योगपती सोमनाथ साखरे यांनी दिली.
देशासाठी महान कार्य केलेल्या सर्व राष्ट्रीय महापुरुष हे देशाचे अमूल्य रत्न आहेत. त्यांना त्यांच्या जातीसाठी सीमीत करू नये. त्यांना भारत देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी वापरावे. फक्त एका जाती धर्मासाठी वापर करू नये. एकच जाती, एकच धर्मामुळे संविधान व निसर्ग वाचवता येत नाही. संविधान व निसर्ग वाचवण्यासाठी सर्व जाती-धर्माची लोक एकत्रित येऊन हम सब भारतीय है म्हणून देश भक्ती सेवा करणे काळाची गरज बनली आहे. या प्रमुख उद्देशाने राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज सोलापूर येथे या थोर महापुरुषांचे जयंती उत्सव साजरा करीत असल्यांची माहिती उद्योगपती अनिल पाटील यांनी दिली.
शुक्रवार १ मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता सोलापुरातील बस स्टॅन्ड जवळलील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याला देशवासियांच्या वतीने राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून सकाळी दहा वाजता पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळा येथून देशभक्तीचा जयघोष करीत भव्य मिरवणूकिस सुरवात होणार आहे. यानंतर चार हुतात्मा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून डफरिन चौक मार्गे, कामत हॉटेल चौक, व्हीआयपी रोड, संगमेश्वर कॉलेज, सात रस्ता चौक येथून मिरवणूक मार्गक्रमण करत गांधी नगर येथील हेरिटेज लॉन (फंक्शन हॉल) येथे कार्यक्रम स्थळी पोहचेल. यानंतर हेरिटेज लॉन येथे देशातील सर्व धर्मीय सर्व जातीय जनतेच्या प्रमुख उपस्थित देशभक्ती कार्यक्रम होणार आहे तरी या देशभक्ती कार्यक्रमाची सर्वांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन उद्योगपती हणमंत कावळे यांनी केले आहे.
देश वाचला तर सर्व जाती, धर्म, पक्ष, परिवार, आम्ही तुम्ही वाचतो. देश वाचला नाही तर कोणीही वाचणार नाही. राष्ट्रधर्म सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराज देशात सर्वांगीण एकता मजबूत करण्यासाठी संविधानिक कर्तव्याची जाणीव देशातील प्रत्येक नागरिकांना करून देण्याचे प्रयत्न करीत आहे. जाती, धर्म, पक्ष, परिवाराची विचार न करता एक सन्याशी हवा मल्लिनाथ महाराज जय भारत माता सेवा समितीची स्थापना करून हातात तिरंगा झेंडा घेऊन सतत देशभर प्रवास करणारे हे दुर्मिळ राष्ट्रीय संत आहेत. ते देशभर अहोरात्र फिरून सशक्त देश व समाज घडविण्याचे कार्य करीत आहेत.
– डॉ. मृत्यूजय निलंगे सोलापूर
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, जनतेच्या कल्याणसाठी अनेक जाती धर्माचे हजारो वीर क्रांतिकारकानी स्वातंत्र्यापूर्वी बलिदान दिले आहे. तसेच सद्या भारत मातेच्या रक्षण करताना शहीद झालेल्या सर्व वीराना शतशः नमन करण्यासाठी भारतातील सर्व थोर महापुरुषांचे आणि शाहिद झालेल्या क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानांचा आदर करण्यासाठी आणि देशभक्ती वाढवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम केला जात आहे.
– सुरेश म्हेत्रे वीट उत्पादक सोलापूर
या पत्रकार परिषदेस जय भारत माता सेवा समितीचे सदस्य अजय शिंदे, अप्पासाहेब बिराजदार,बसवराज बिराजदार, मल्लिनाथ एंटमनी, महेश रगटे, अरुण बडदलकर, शंकर कस्तुरे, विजय पाटील, अनिल पाटील आदिजण उपस्थित होते.


