March 9, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – एकही मुलगी वंचित राहणार नाही : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्ट निर्देश

चंद्रकांत पाटील

मराठी सारांश

उच्च शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना १०० टक्के शुल्क सवलत मिळावी यासाठी मोफत शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. कोणतीही पात्र मुलगी या योजनेपासून वंचित राहता कामा नये, यासाठी सर्व महाविद्यालयांनी काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.


English Summary

Minister Chandrakant Patil has directed all colleges to strictly implement the Free Higher Education Scheme for economically weaker female students. He emphasized that not a single eligible girl should be deprived of this benefit and colleges must ensure compliance.


सविस्तर माहिती 

बुधवारी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना कशी प्रभावीपणे अंमलात आणता येईल, यावर चर्चा झाली.

सरकारकडून शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील मुलींना १००% फीस व परीक्षा शुल्क सवलत दिली जात आहे. मंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट सांगितले की, “CAP process ने admission घेतलेल्या विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नये. मागील वर्षी जर कुठल्याही संस्थेने fees घेतली असेल, तर ती परत द्यावी.”

शिष्यवृत्ती थेट संस्थेच्या खात्यात आणि परीक्षा शुल्क विद्यार्थिनींच्या आधार संलग्नित खात्यावर जमा होत आहे. तक्रारींसाठी Helpline व नोडल अधिकारी नेमण्यात आले असून, कोणत्याही अडचणीसाठी लगेच संपर्क साधता येईल.

राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत, १६ जून २०२५ पर्यंत तंत्रशिक्षण विभागाकडून १ लाख ३ हजार ६१५ मुलींना ₹७८४.४६ कोटीचा लाभ दिला गेला आहे. उच्च शिक्षण विभागाकडून देखील हजारो अर्ज प्रक्रिया केली जात आहे, ज्यापैकी अनेकांना निधी वितरित केला गेला आहे.

महत्त्वाचे म्हणजे ही योजना केवळ डिप्लोमा किंवा अंडरग्रॅज्युएट साठी नाही, तर MBA, MCA, M.Pharm यांसारख्या postgraduate व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीही लागू आहे.