March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

करमाळा येथे  मराठा समाजाच्या साखळी उपोषणास महिलांची प्रचंड प्रमाणात उपस्थिती

करमाळा येथे  मराठा समाजाच्या साखळी उपोषणास महिलांची प्रचंड प्रमाणात उपस्थिती

करमाळा :
करमाळा तालुका व शहर सकल मराठा समाज यांच्या वतीने मराठा योद्धा जरांगे पाटील याना समर्थन म्हणून साखळी  उपोषणाला
महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती या महिलांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या साखळी उपोषणाला
यावेळी एक मराठा लाख मराठा,या नालायक सरकारचा धिक्कार असो,छत्रपती शिवाजी महाराज की जय अश्या घोषणांनी  तहसील परिसर दणाणून गेला आहे या उपोषणाला सुरुवात सकाळी 11 वा सुरुवात झाली यावेळी सर्व पक्ष भेद विसरून
महिला कार्यकर्त्या एकत्र आले होते
यावेळी कु जान्हवी राहुल सावंत वय 8 वर्षे हिच्या भाषणाने वातावरणात जोश निर्माण झाला तिच्या भाषणाने प्रत्येक जणांच्या अंगावर शहारे निर्माण झाले तर यावेळी प्रा घुमरे सर,प्राचार्य मिलींद फंड,ह भ प शेवलीकर महाराज यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले हे चालू असलेल्या साखळी उपोषण असेच चालू राहणार असल्याचे करमाळा मराठा समन्वयकानी सांगितले आहे यावेळी करमाळा तालुक्याचे तहसीलदार विजय जाधव व पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवठे यांनी हे निवेदन महिला भगिनींकडुन स्वीकारले आहे
सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी यावेळी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून योग्य तो बंदोबस्त ठेवला होता