सोलापूर दि.29 :- शालेय शिक्षण विभागंतर्गत शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर विभागाकडील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंश:त अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित सलंग्न सर्व शाळेवर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या तक्रारी व अडचणी असतात. सदर तक्रारी व अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर मा.शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाच्या वतीने महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी दुपारी 3.00 वाजता स्थळ – हरिबाई देवकर प्रशाला येथे संवाद दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संवाद दिन आयोजन अर्ज स्विकृतीचे निकष प्राप्त निवेदनावर कार्यवाही व इतर अनुषंघीक बाबीचा तपशिल सर्व संस्था/प्रशालेस कळविणेत आलेला आहे.
वरील प्रमाणे जिल्हातील सर्व शिक्षक /शिक्षकेत्तर संघटना, इतर शिक्षण विभागाशी निगडीत संघटना यांना आवाहन करण्यात येते कि, संवाद दिना दिवशी उपस्थित राहून आपले निविदेन,व इतरव्यवहार दयावे. तसेच संवाद दिना करीता उपस्थित राहणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने रजा मंजूर करुन घेवून उपस्थित रहावे. असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जि.प. सचिन जगताप यांनी कळवले आहे.
0000



More Stories
सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या गाडीचा अपघात
श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
विधानसभा निवडणुकीत भाजपनेच केला शहाजी पाटलांचा गेम