March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

मंद्रूप येथे शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अमर पाटील यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न

मंद्रूप येथे शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अमर पाटील यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न
मंद्रूप, दक्षिण सोलापूर : मंद्रूप येथे २५१ दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. अमर रतिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते, इतिहास अभ्यासक आणि शिवप्रवक्ते मा. श्री. नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सभा संपन्न झाली.
शिवचरित्रातून प्रेरणा आणि निवडणुकीचा संदेश
या सभेत नितीन बानगुडे पाटील यांनी शिवचरित्राची प्रेरणा घेत सांगितले की, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नेहमीच शिवरायांच्या विचारांचा आणि जनतेच्या कल्याणाचा आदर्श घेतला आहे. आगामी निवडणुकीत मशाली समोरील बटन दाबून नवतरुण, सुशिक्षित आणि विकासाच्या संकल्पनेला समर्पित अमर रतिकांत पाटील यांना निवडून द्यावे.”
त्यांनी लोकांना प्रबोधन करत सांगितले की, या निवडणुकीत अमर पाटील यांना संधी दिल्यास मतदारसंघाच्या विकासासाठी एक नवे पर्व सुरू होईल. त्यांच्या भाषणामुळे सभेत उपस्थित नागरिक भारावून गेले.
मान्यवरांची उपस्थिती
सभेला मंचावर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये मा. आमदार रतिकांत (दादा) पाटील, मा. रविकांत बॉस पाटील, मा. शिवशरण अण्णा पाटील, सौ. अस्मिता ताई गायकवाड, भीमराव बाळगे, सुधीर लांडे, राशीद शेख, बिडवे सर, कईम बलोल खान, सिद्धू खरात, बाबासाहेब वाघमोडे, विराज पाटील, नवले साहेब, संतोष बरोडे, असिफ शेख, आनंद थोरात, विनायक पाटील, मोहम्मद शेख, किरण सुर्वे, अल्लाउद्दिन शेख, अस्लम शेख यांचा समावेश होता.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सभेला मंद्रूप ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभेतील प्रत्येक व्यक्ती अमर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्या विजयाची भावना व्यक्त करत होती.
अमर पाटील यांचे संबोधन
सभेच्या शेवटी अमर रतिकांत पाटील यांनी जनतेचे आभार मानले आणि सांगितले की, “मी तुमच्या तालुक्याचा शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर, शेतीपूरक योजना, आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मी पुढील पाच वर्षे सतत काम करेन.”
नवीन लाटेचा संकल्प
मंद्रूप येथे झालेल्या सभेने मतदारसंघात नव्या लाटेचा संकल्प आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे.
अमर पाटील यांचे नेतृत्व, शिवसेना पक्षाचा पाठिंबा, आणि जनतेचा विश्वास यामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजू अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.