नातेपुते ता.माळशिरस
सुपुत्र अनिल माने हे बी एस एफ.मध्ये २३ वर्ष देशसेवा करून निवृत्त झाले,त्यानिमित्ताने नातेपुते ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सेवा निवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
मेजर अनिल माने यांचा सत्कार आयआरएस.समीर वानखेडे,अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडे, मा.आ.रामहरी रूपणवर,धैर्यशील मोहिते पाटील,राजेंद्र पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील हे होते.
यावेळी बोलताना समीर वानखेडे म्हणाले की,”आज समाजा त मेजर अनिल माने सारख्या युवकांची गरज आहे कारण जे देश प्रेमाने भाराऊन जाऊन देश सेवा करतात यासाठी आपले खऱ्या खुऱ्या आयुष्यातील हिरो म्हणजे सैन्यातील जवान. माझ्या टीम मध्ये असणारे बी एस एफ चे जवान हे माझ्याशी भावाप्रमाणे राहत होते . देशप्रेम ही परिभाषा जवानांकडून शिकायला मिळते. नव्या पिढीतील मुलांना आपल्या जीवनातील खरे हिरोच माहित नाहीत. देशभक्ती कधी १५ ऑगस्ट २६ जानेवारी या पुरती मर्यादित न ठेवता ती रोजच असावी. पालकांना माझी विनंती आहे की मुलांना आपले खरे आदर्श यांची माहिती करून द्यावी.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अभिनेत्री क्रांती रेडकर,” समीर वानखेडे यांनी अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांचे कौटूंबिक जीवन प्रवास सांगताना उपस्थितांची मने अक्षरशः हेलावून गेली होती.त्या म्हणाले की मेजर अनिल माने व त्यांच्यासारखे समीर वानखडे चे असलेले साथीदार याच्यामुळे मला कधीच समिर जी ची काळजी वाटली नाही चार चार दिवस एखाद्या मोहिमेवर नवरा गेल्यानंतर एखाद्या पत्नीची होणारी घालमेल सांगताना उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले.
प्रमुख पाहुणे मा.आ.रामहरी रुपणवर बोलताना म्हणाले,” अगदी प्रतिकूल परिस्थिती असताना अनिल माने यांनी प्रामाणिक देशसेवा केली.आणि आपल्या कुठुंबाची मान उंचावली.आज समीर वानखेडे यांचे सारखे धाडशी अधिकारी आपले काम चोखपणे बजावत असतात परंतु नेते मंडळींना डोईजड झाले की बदली सारखी शिक्षा त्यांना दिली जाते.
समीर वानखेडे व क्रांती रेडकर यांचे नातेपुते शहरात जंगी स्वागत करण्यात आले.नातेपुते पांढरे मळा या ठिकाणी मा. ग्रा. पं.सदस्य सुरेश पांढरे,गणपत पांढरे,नगरसेवक रावसाहेब पांढरे,रणजीत पांढरे,संतोष काळे,बाळासाहेब पांढरे यांनी स्वागत केले .
नातेपुते शहरात प्रवेश केल्यानंतर समीर वानखेडे व क्रांती रेडकर यांनी मेजर अनिल माने यांचे समवेत शहीद जवान रघुराज केंगार यांच्या मातोश्री यांची भेट घेतली.सोनवणे इलेक्ट्रॉनिक पासून ते राज आनंद मंगल कार्यालय इथपर्यंत खुल्या जीप मधून समीर वानखेडे,क्रांती रेडकर व मेजर अनिल माने यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. आ. रामहरी रुपणवर, ऍड. बी. वाय.राऊत,मा.पोलिस पाटील समाजरत्न राजेंद्र पाटील, ऍड. डी. एन.काळे, रिपाईचे नेते एन.के.साळवे, राष्ट्रवादीचे नेते धैर्यशील देशमुख,नगराध्यक्ष सौ अनिता लांडगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मामासाहेब पांढरे, प स सदस्य माऊली पाटील ,मा.सरपंच अमरशिल देशमुख,नगरसेवक अतुल पाटील,विजय उराडे,शिवाजी पिसाळ,संतोष काळे मालक,बाळासाहेब पांढरे,प्रवीण काळे,विजय पिसाळ व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.




More Stories
राज्य सीईटी आता वर्षातून दोन वेळा; पीसीएम, पीसीबी आणि एमबीए अभ्यासक्रमांसाठी मोठा निर्णय
उबाठा व काँग्रेसमधील दुराव्यामुळे सोलापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला बसणार खीळ
राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास रायगडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद