सोलापूर
विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण,

विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण,
पंढरपूर : : श्रीमती गोदाबाई गणपत गोगरे, रा. शिरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथील भाविकांनी दिनांक 4 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी सुवर्ण तुळशीपानांचा हार अर्पण केला.
सदर हारामध्ये तुळशीपाने नग ३२ व गोल मणी नग ६४ असून त्याचे एकूण वजन ३५.००० ग्रॅम आहे. सदर सुवर्ण हाराची अंदाजित किंमत ₹५,००,८५०/- इतकी आहे.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने देणगीदार भाविकांचा सन्मान मंदिर समिती सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर) यांच्या हस्ते करण्यात आला.



