March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

सोलापूरातील शायरांची मैफल” कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर  :-सोलापूररातील साहित्य क्षेत्रात ज्यांनी भरीव कामगिरी केली अशा नामांकित साहित्यकांचा सन्मान व्हावा तसेच नवोदित शायराना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने सोलापूरातील शायरांची मैफल या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ऊर्दु घर सांस्कृतिक समितीचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली.

ही मैफिल शनिवार दि.10 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता ऊर्दु घर सोलापूर ( छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय समोर) होत आहे. या मुशायरामध्ये सोलापूर तसेच सोलापुरातील जेष्ठ शायरांचा व नवोदित कवींचा सहभाग असणार आहे.

या मैलिलीच्या अध्यक्षस्थानी अब्दुल रशीद अरशद व निवेदक आसिफ इकबाल असणार आहेत. सोलापूरातील शायर मिर अफजल मिर, बशीर अहमद बशीर, वहाब जमील, हबीब अहमद शौक, अजीजुल वहाब, शफी  सत्तारी, जाकीर तनवीर, आरजू राजस्थानी, नासिर अशरफी, रफी नवाज, अब्दुल शुकुर शौर, इक्बाल दुर्वेश, बाकर हाफिज साहब, तालिब सोलापुरी, अश्फाक जैद, नजमुद्दीन अंजूम, इरफान करीगर, शादा पितापुरी, सरफराज बंदेनवजी, वजाहत अब्दुल सत्तार, इत्यादींचा समावेश राहणार आहे.  तरी ऊर्दु प्रमी रसिकांनी या अनोख्या मुशायराचा मैफिलीत उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहनही  ऊर्दु घर सांस्कृतिक समितीचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.