सामाजिक उपक्रम

नववर्षाची सुरुवात यशस्वी निर्व्यसनी वाहन चालकांच्या सत्कार सोहळ्याने

सोलापूर :  एक जानेवारी संकल्प दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधून वासल्य ट्रस्ट मुंबई व सारथी युथ फाऊंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार वसाहतीतील  गरजू बेरोजगार युवक- युवतींना चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्याचा शुभारंभ नववर्षाच्या निमित्ताने करण्यात आला.
     वाहन चालक म्हटलं की व्यसन एक प्रकारे सूत्रच पाहण्यास मिळते. निर्व्यसनी वाहनचालक बनविण्यासाठी सारथी युथ फाऊंडेशनच्या वतीने प्रयत्न वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने केला जात असल्याची माहिती सारथी युथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
     नवीन प्रशिक्षण बॅचच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून प्रफुल्ल पानगावकर (अध्यक्ष मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन सोलापूर). चार्वाक बुर्गुल (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी) अर्जुन अष्टगी (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ सोलापुर नॉर्थ) शहाजी ढोले (संचालक शिवधन मोटार ड्रायव्हिंग स्कूल) उपस्थितीत  होते. चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या १५ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण किटचे वाटप करण्यात आले.
वात्सल्य ट्रस्ट मुंबई व सारथी युथ फाऊंडेशन यांच्या वतीने ही सहावी बॅच सुरू करण्यात येत आहे. आजतागायत ८५ गरजु बेरोजगार युवक-युवतींना वात्सल्य ट्रस्ट मुंबई व सारथी युथ फाऊंडेशनच्या वतीने चारचाकी व तीनचाकी वाहन चालक प्रशिक्षण देण्यात आले त्यापैकी ४८ लाभार्थींनी वाहन चालक व्यावसायाला उपजीविकेचे साधन बनविले आहे. वेळी पाचव्या बॅचमध्ये रिक्षा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व प्रशिक्षणानंतर स्वतः रिक्षा चालक म्हणून यशस्वीरित्या कार्य करणाऱ्या आठ रिक्षाचालकांचा सत्कार करण्यात आला त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यशस्वी रिक्षा चालकांनी रिक्षा प्रशिक्षणाचा स्वतःच्या आयुष्यामध्ये कसा लाभ झालेला आहे याविषयी त्यांनी आपली मनोगत यावेळी व्यक्त केली.
    मनोगत व्यक्त करताना अर्जुन अष्टगी म्हणाले,” ज्याप्रमाणे उपजीविकेसाठी सारथीने आपल्या प्रशिक्षणाचे सारथ्य स्वीकारलेला आहे त्याचप्रमाणे आपणही समाजामध्ये व्यसनमुक्त ड्रायव्हर बनण्याचे सारथ्य आपण करावे असे आवाहन त्यांनी यावेळेला केले.” चार्वाक बुर्गुल बोलताना म्हणाले, “निर्व्यसनी ड्रायव्हर तयार करणे ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. वात्सल्य ट्रस्ट मुंबई आणि सारथी युथ फाऊंडेशन यांनी हे अभिमानास्पद कार्य केलं आहे त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक.” प्रफुल्ल पानगावकर बोलताना म्हणाले, “वाहतुकीच्या नियमांसोबत निर्व्यसनी वाहन चालक बनणं ही आपली एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी ओळखून आपण पुढे वाटचाल करावी यशस्वी झालेल्या रिक्षा चालकांनी ज्याप्रमाणे अनुभव घेतला आहे तो अनुभव आपणही घेऊन भविष्यामध्ये वाहन चालन हे एक आपलं उपजीविकेचे साधन बनवून समाजामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व सिद्ध करावं.”
     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारथी युथ फाउंडेशनचे कोअर कमिटी सदस्य तुकाराम चाबुकस्वार प्रशिक्षिका भाग्यश्रीचा चाबुकस्वार स्वयंसेवक आदित्य वाघमारे, स्नेहा येरगुंटला, अजय इंगळे, महेश मोने यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सारथी कोअर कमिटी सदस्य हनुमंत सलगर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button