सोलापूर

लहान मुलांना मोफत सुवर्णबिंदू प्राशनाचे आयोजन

श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम, कौशल्या बहुउद्देशीय व संशोधन संस्था, आयोजित आणि सोमा क्लिनिक, वैष्णव मारुती मेडिकल यांचा उपक्रम

 

सोलापूर : सुवर्णबिंदू प्राशन हे एक प्राचीन आयुर्वेदिक संस्कार असून लहान मुलांमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढून शारिरीक आणि मानसिक वृध्दी होते. सुवर्णबिंदू प्राशनाने लहान मुलांचे बौध्दिक, शारिरीक विकास आणि पचनक्रिया सुधारुन भूक वाढते. तसेच लहान मुलांच्या शरीरासाठी अनेक फायदे मिळतात. जन्मल्यापासून ते वयाच्या १६ वर्षांपर्यंत ‘सुवर्णबिंदू’ दर महिन्याला ‘पुष्य नक्षत्रा’ला दिले जातात. म्हणून, श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम, कौशल्या बहुउद्देशीय संस्था आयोजित आणि सोमा क्लिनिक – वैष्णव मारुती मेडिकल यांच्या सहकार्याने हैदराबाद रोड वरील जुना विडी घरकुल येथील वैष्णव मारुती देवस्थान मंदिर येथे लहान मुलांना मोफत सुवर्णबिंदू प्राशनाचे आयोजन केल्याची माहिती कौशल्या बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवा,  सौ. दिपीका यलदंडी, फाउंडेशनचे सहसचिव नारायण येरवा, सखी संघमच्या कार्याध्यक्षा सौ. सविता येदूर यांनी दिले आहे.

सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम, कौशल्या बहुउद्देशीय व संशोधन संस्था, आयोजित आणि सोमा क्लिनिक, वैष्णव मारुती मेडिकल यांच्या सहकार्याने गुरुपुष्यामृत निमित्त गुरुवार ‘२१ मे रोजी सकाळी १० वाजता’ पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या शुभहस्ते आणि  सतिश सिरसिल्ला, डॉ.अजय पोन्नम, युवराज सरवदे,  दिपीका यलदंडी, उज्वला दासरी, शारदा रामपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉ. शिवानी सोमा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ होईल. तसेच वैष्णव मारुती मेडिकल यांच्या तर्फे ‘लकी ड्रॉद्वारे’ ५ विजेत्यांना (प्रत्येकी एक) ‘सुवर्णबिंदू प्राशन बाटली’ देण्यात येणार आहे. फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून या मोफत सुवर्णबिंदू प्राशनास जास्तीत जास्त लहान मुला – मुलींसह पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button