महाराष्ट्रसोलापूर

‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अंतर्गत मंगळवेढयाची पाहणी

मंगळवेढा  :
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘स्वच्छ सुंदर बस स्थानक’ अभियान अंतर्गत मंगळवेढा बसस्थानकांची पाहणी मंगळवारी करण्यात आली. ‘स्वच्छ सुंदर बस स्थानक’ अभियान स्पर्धात्मक अंतर्गत विभागीय स्तरावर विभाग नियंत्रक यांच्या अधिपत्याखाली समिती नेमून समिती स्थापन करण्यात आली आहेत. त्यात विभागीय स्थापत्य अभियंता, उपयंत्र अभियंता, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी, पत्रकार प्रतिनिधी व प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी यांचा यामध्ये समावेश केला आहे. मूल्यमापनाच्या आधारे ‘अ’, ‘ब’,व ‘क’ वर्ग  बसस्थानकांचे मूल्यांकन निकष तक्त्याद्वारे गुणांकन करून स्वातंत्र्य गुण  असून त्याची सरासरी मूल्यांकन समजण्यात येणार आहेत.या आधारे  प्रादेशिक स्तरावर ‘अ’, ‘ब’, व ‘क’ चे वर्गिकरणकृत बसस्थानकांना स्वतंत्ररित्या असे १,२,३ क्रमांक देण्यात येणार आहेत. १ मे २०२४ रोजी हे अभियान स्पर्धात्मक स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. यामध्ये उत्कृष्ट बस स्थानकांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत बसस्थानकाचे कालबद्ध मूल्यांकन करणे व त्या आधारे गुण देऊन त्यांची पारितोषिक कामासाठी शिफारस करणे, यासाठी विभागीय स्तरावर समित्या नेमण्यात आली आहेत. या समितीने दर २ महिन्यांनी मूल्यांकन करून त्याचा अहवाल तयार करून सादर करण्याचे आहे. या अभियानासाठी १०० गुण आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या ६ प्रदेशामध्ये प्रत्येकी ९ यानुसार प्रादेशिक स्तरावर ५४ बसस्थानके पुरस्कारासाठी निवडण्यात येणार आहेत. परंतु एकूण गुणांच्या ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त बसस्थानकाचाच विचार या पुरस्कारासाठी केला जाणार आहे. पुरस्कार प्राप्तीसाठी संबंधित व बसस्थानकाला किमान ७५ गुण मिळणे आवश्यक आहे. ज्या बस स्थानकावर मुख्य इमारतीचे बांधकाम सुरू असेल त्या बसस्थानकावर प्रवासांच्या सोयीसाठी उभारलेल्या तात्पुरत्या बैठक व्यवस्थेचा समावेश बस स्थानक इमारत म्हणून करण्यात येईल. प्रादेशिक स्तरावरील विजेत्या बस स्थानकाच्या पारितोषिकाची रक्कम ‘अ’ वर्ग प्रथम क्रमांक १० लाख रुपये, चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक ५ लाख रुपये व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक २ लाख ५० हजार व प्रशस्तीपत्र ‘ब’ वर्ग प्रथम क्रमांक ५ लाख रूपये, चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक २ लाख ५० हजार रूपये व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक १ लाख ५० हजार व प्रशस्तीपत्र, ‘क’ वर्ग प्रथम क्रमांक १ लाख रुपये चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक ५० हजार व प्रशस्तीपत्र आणि तृतीय क्रमांक २५ हजार व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. प्रादेशिक स्तरावरील पुरस्काराची एकूण रक्कम १ कोटी ६९,५०,००० एवढी आहे. यामध्ये ‘अ’ वर्ग प्रथम क्रमांक ५० लाख रुपये,चषक व प्रशस्तीपत्र, ‘ब’ वर्ग प्रथम क्रमांक २५ लाख रुपये, चषक प्रशस्तीपत्र, आणि ‘क’ वर्ग प्रथम क्रमांक १० लाख रुपये,चषक व प्रशस्तीपत्र असे देण्यात येणार आहे. या मूल्यमापनामध्ये
बसस्थानकाची सखोल स्वच्छता करणे, प्रसाधन गृहाची स्वच्छता, बसस्थानक व्यवस्थापन, हरित बसस्थानक, बसस्थानकावर येणाऱ्या बसेसची सखोल स्वच्छता व नियमित करावयाची स्वच्छता, सखोल स्वच्छता दर पंधरा दिवसाला, विविध महोत्सवाचे आयोजन करणे, प्रवाशी वाढवा अभियान राबविण्याचे आहे. राज्यात एकूण ५८० बस स्थानके आहेत. यामध्ये मुंबई ‘अ’ वर्गातील २३, ‘ब’ वर्ग २५, ‘क’ वर्ग ४३, अमरावती ‘अ’ वर्ग १५, ‘ब’ वर्ग २९, ‘क’ वर्ग २७, पुणे ‘अ’ वर्ग ४५, ‘ब’ वर्ग ३७, ‘क’ वर्ग ५८, नाशिक ‘अ’ वर्ग २९, ‘ब’ वर्ग ४१, ‘क’ वर्ग २८, नागपूर ‘अ’ वर्ग ९, ‘ब’ वर्ग २२, ‘क’ वर्ग ३०, औरंगाबाद ‘अ’ वर्ग २६, ‘ब’ वर्ग ५९, ‘क’ वर्ग ३४ असे बस स्थानक आहेत. या स्वच्छ सुंदर बसस्थानक स्पर्धात्मक अभियान मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, जेऊर, टेंभुर्णी, पंढरपूर जुने व नवीन, अकलूज, माळशिरस, नातेपुते, सांगोला, मंगळवेढा, मोडनिंब, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर कुमठा नाका, अक्कलकोट, वागदरी, वैराग व बार्शी बसस्थानकांची सोमवार ते शुक्रवार पर्यंत समिती पाहणी करून शासनाला अहवाल देणार आहे. यात मंगळवेढा बस स्थानकांची अहमदनगर येथील समितीने पाहणी केली. या पाहणी समितीमध्ये कर्मचारी वर्ग अधिकारी म्हणून बाळासाहेब एकशिंगे, विभागीय अभियंता संजय दरेकर, उपयंत्र अभियंता, महादेव शिरसाट, पत्रकार प्रतिनिधी म्हणून औदुंबर ढावरे आणि सोलापूर विभागातील वाहतूक परिवेक्षक सुवर्णा धोत्रे यांनी मंगळवेढा
बसस्थानक व परिसराची पाहणी केली. यावेळी आगार प्रमुख संजय भोसले, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी, अश्विनी एकबोटे, वरिष्ठ लिपीक धनाजी पाटील, अमोल काळे, एसटी कामगार सेनेचे सचिव ब्रह्मानंद ठाकूर, दत्तात्रय रायबान, तानाजी कोळी, वाहक अमोल शिनगारे, कदरकर, वाहतूक नियंत्रक मंगेश रोहिटे व मेकॅनिकल अशोक घाडगे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button