सोलापूर

महात्मा फुले विद्यालयात नवीन शासनमान्य चित्रकला परीक्षा केंद्राचे उद्घाटन   

बेंबळे : टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालयात चालू वर्षीपासून एलिमेंटरी व इंटरमीजिएट ग्रेड या चित्रकला परीक्षा  केंद्रास, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून  मंजुरी मिळालेली असुन त्याचे उद्घाटन चित्रकलेचे सेवानिवृत्त कलाशिक्षक आर्टमास्टर  कुंडलीक माळी यांच्या हस्ते करण्यात आले. परीक्षा केंद्रामध्ये एलिमेंटरी चित्रकला परीक्षेसाठी 202 विद्यार्थी व इंटरमीजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेसाठी 64 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यावेळी सर्व उपस्थित परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष नारायण भानवसे यांनी प्रास्ताविक करून संस्थेविषयी माहिती दिली व नव्याने मंजूर झालेल्या चित्रकला केंद्राचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे कुंडलिक माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की चित्रकला ही सक्तीने  नव्हे तर मनापासून तन्मयतेने शिकण्याची विद्या आहे विद्यार्थ्यांनी ही कला आत्मसात करताना परिश्रम घेणे आवश्यक आहे, यावेळी त्यानी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमस संस्थेचे अध्यक्ष  नारायण भानवसे, विद्यालयाचे मुख्याध्यापक व केंद्रसंचालक  विजय यादव  यांचेसह माऊली पवार आणि विद्यालयातील कलाशिक्षक  संतोष माळी, श्रीमती रेश्मा मोरे,  नागनाथ सुक्रे,  शुभम हवलदार, सचिन खडके,  सोहम व्यवहारे,  रमेश नाळे,  गिरीश देशपांडे, मच्छिन्द्र भुसारे, सचिन जाधव, शिवकन्या कानडे, प्रियंका हावळे, प्राजक्ता नागटिळक, अश्विनी कांबळे,  वदंना क्षीरसागर, सायली गिरमे, अंकिता बोराटे,  सुजित साळुंखे, अनिल राऊत, आदी मान्यवरासह प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button