सोलापूर

न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ नियोजनासाठी सोलापुरात शुक्रवारी बैठक;

आ.रोहित पवार राहणार उपस्थित, रूपरेषा ठरणार

 

‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ नियोजनासाठी सोलापुरात शुक्रवारी बैठक; आ. रोहित पवार राहणार उपस्थित रूपरेषा ठरणार

​सोलापूर : शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शेगाव ते नागपूर काढण्यात येणाऱ्या ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’च्या नियोजनासाठी सोलापूर शहरात शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) सकाळी १०.३० वाजता​ आयएमए हॉल, डफरीन चौक, सोलापूर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. डफरीन चौक येथील आयएमए (IMA) हॉलमध्ये होणाऱ्या या बैठकीस आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
​“व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही, लाखो शेतकरी कुटुंबांच्या भविष्यासाठी” आणि “बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी एकजुटीने सहभागी होऊया!” असे आवाहन करणाऱ्या या ट्रॅक्टर मोर्चाचा मार्ग शेगाव ते नागपूर असा निश्चित करण्यात आला आहे. येत्या ४ डिसेंबर २०२६ ते ९ डिसेंबर २०२६ या कालावधीत हा मोर्चा पार पडणार असून, तो शेगाव, बाळापूर, बार्शी टाकळी, कारंजा लाड, दारव्हा, यवतमाळ, कळंब, राळेगाव, हिंगणघाट, बुटीबोरी मार्गे नागपूरकडे जाणार आहे.
​शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी होणाऱ्या या नियोजन बैठकीस सोलापुरातील सर्व समविचारी पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी व शेतमजुरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button