सोलापूर

मोहोळमध्ये युनियन बँकेचा १०८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दर्जेदार सेवांमुळे ग्राहक समाधानी

मोहोळमध्ये युनियन बँकेचा १०८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दर्जेदार सेवांमुळे ग्राहक समाधानी;

शिव निर्णय/ मोहोळ : युनियन बँक ऑफ इंडियाचा १०८ वा वर्धापन दिन मोहोळ शाखेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, तसेच ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी नामदेव नरुटे यांचे मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी नामदेव नरुटे व इतर सर्व ग्राहकांचे बँकेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना नामदेव नरुटे यांनी युनियन बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. तब्बल १६ वर्षांच्या बँकेसोबतच्या आपल्या प्रवासाची आठवण सांगताना त्यांनी सांगितले की, “युनियन बँक ऑफ इंडियाच्या या शाखेत सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा योग्य व सर्वश्रेष्ठ आहेत.” बँकेमध्ये मिळणाऱ्या लॉकर सुविधा, डिपॉझिट, चेक बुक, एटीएम तसेच विविध प्रकारच्या कर्जां संदर्भातील (ॲडव्हान्सेस) तत्पर कस्टमर सेवेमुळे ग्राहकांमध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण आहे. याप्रसंगी उपस्थित ग्राहकांनी बँकेच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या वतीने उपस्थित ग्राहकांचे आभार मानून केक कापून तोंड गोड करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचारी:
कार्यक्रमाला युनियन बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी योगेश सुरवसे, उपशाखा अधिकारी विजय सुर्यगंध, कृषी अधिकारी प्रशांत मोरे, कॅशियर रेणुका वीर, कर्मचारी बालाजी जाधव, अजय जोशी, सुरज मोरे आणि ‘Sud Life’ चे अर्जुन खंडागळे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाला बँकेचे इतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते. सर्वांच्या उत्साही सहभागामुळे हा वर्धापन दिन सोहळा अत्यंत देखणा आणि यशस्वी ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button