महाराष्ट्र

सहकार विभागाच्या जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षा दि. 26 मे पासून सुरु

 

सहकार विभागाच्या जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षा दि. 26 मे पासून सुरु.

सोलापूर दि.22 (जिमाका) :- सहकार विभागामार्फत माहे मे. 2026 मध्ये घेण्यात येणारी जी. डी. सी. अॅन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षा दि. 26, 27 व 28 में 2026 रोजी सिध्देश्वर प्रशाला, सिध्देश्वर पेठ, सोलापूर या केंद्रावर घेण्यात येणार आहेत.
सदर परिक्षेसाठी परीक्षार्थीना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ज्या परिक्षार्थिना तांत्रिक कारणास्तव ऑनलाईन प्रवेशपत्र मिळू शकले नाही आणि ज्या परिक्षार्थिचा मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून प्राप्त हजेरीपटामध्ये समावेश आहे अशा परीक्षार्थीना परिक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येईल. अशा परिक्षार्थीनी स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड इ.) सोबत आणणे आवश्यक आहे असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर, यांनी कळविले आहे.
00000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button