GJ-15/YY-6520 या वाहनाकरीता मालकी हक्क किंवा दावा सादर करण्याचे आवाहन
रायगड दि.10 :- पेण वनपरिक्षेत्रातील परिमंडळ पेण मध्ये दि. 18 मार्च 2023 रोजी विना परवाना खैर सोलिव नग 177, घ.मी. 5.361 व खैर किटा 4.500 घ.मी. वाहन क्रमांक GJ-15/YY-6520 अन्वये वाहतुक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 (1), 42 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे कलम 31 (1) अन्वये पेण राऊंड गुन्हा नं. आय टी /07/2023, दिनांक- 18 मार्च 2023 वनगुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तसेच आजतागायत वाहन क्र. GJ-15/YY-6520 या वाहनाकरीता कोणीही आपला मालकी हक्क किंवा दावा या कार्यालयात सादर केलेला नाही. या वाहनाकरीता या कार्यालयात 7 दिवसांत मालकी हक्क किंवा दावा न केल्यास सदर वाहन सरकार जमा करण्यात येईल. सात दिवसानंतर कोणतीही सबब ग्राहय धरली जाणार नाही, असे वनपरिक्षेत्र अधिकारी पेण (संरक्षण ) के.बी.पाटकर यांनी कळविले आहे.
संपर्कासाठी पत्ता- वनपरिक्षेत्र कार्यालय पेण, तहसिल कंम्पाऊंड, ता. पेण, जि- रायगड, पिन कोड 402107 मोबाईल नंबर – 9960802320.