सोलापूर

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडून प्राथमिक शिक्षण विभागाचा आढावा

 

*गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य*

*मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडून प्राथमिक शिक्षण विभागाचा आढावा*

*जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाची आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी *प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख उपस्थित होते.*
*
*जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले असून, प्रत्येक शाळेत गणवेश वाटपाची प्रत्यक्ष तपासणी करून सर्व पात्र विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्याची खात्री करावी,*
*सर्व शाळांना वितरित करण्यात आलेल्या गणवेशाची गुणवत्ता तपासावी. विद्यार्थ्यांना याची केंद्रप्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.*

*तसेच आदर्श शाळा उपक्रमाचा शाळानिहाय आढावा घेऊन आवश्यक त्या भौतिक व शैक्षणिक सुविधांची पूर्तता करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.*

*प्रत्येक शाळेचे A, B, C आणि D श्रेणीनुसार वर्गीकरण करून D श्रेणीतील शाळांना C, श्रेणीतील शाळांना B आणि B श्रेणीतील शाळांना A श्रेणीत आणण्यासाठी शिक्षण* *विभागातील सर्व अधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.*

*“प्रत्येक शाळेची गुणवत्ता सातत्याने उंचावत नेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा A श्रेणीत आणणे हे आपले सामूहिक उद्दिष्ट असावे,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.*
*PM SHRI शाळांना नियमित भेटी देऊन शाळांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सक्त सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सर्व केंद्रप्रमुख व संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेला दिल्या.*
*जिल्ह्यात PM SHRI योजनेंतर्गत 39 शाळा* *कार्यान्वित असल्याची माहिती**बैठकीत सादर करण्यात आली.*
तसेच UDISE Plus पोर्टलवरील माहितीची अचूकता व अद्ययावत नोंदी, तसेच ‘आदर्श शाळा’ उपक्रमाची शाळानिहाय प्रगती याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. उपलब्ध पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि विविध उपक्रमांच्या आधारे प्रत्येक शाळेची प्रगती तपासून शाळांचा दर्जा सातत्याने उंचावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.*
दक्षिण सोलापूर गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत असलेला इंग्रजी शिक्षणाचा पायलट प्रोजेक्ट महत्त्वपूर्ण असून, त्याच्या परिणामांचा आढावा घेऊन हा उपक्रम पुढील टप्प्यात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेचे आकलन, संभाषण कौशल्य आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पायलट प्रोजेक्टमधून मिळणारे अनुभव, परिणाम आणि चांगल्या पद्धती इतर तालुक्यांमध्येही प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदर आढावा बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button