कारकल येथील श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्रीक्षेत्र कारकल येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त बुधवार दिनांक २२ एप्रिल पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ पासुन सुरु होणार असून बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सहा वाजेपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत कपीलसिद्ध श्री मल्लिकार्जुन व विरभद्रेश्वर श्री भ्रमरांबिका देवी व श्री धानम्मा देवींच्या दिव्य मुर्तीची महारूद्राभिषेक संपन्न होणार आहे
त्याचप्रमाणे माळकवठेचे मठाधिपती षटस्थल ब्रम्ही श्री डॉक्टर गुरू पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी यांची अड्ड पालखी व १०१ सुहासिनी जलकुंभासह भव्य मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे
त्यानंतर सकाळी ठिक अकरा वाजल्यापासून श्री उमामहेश्वर हरदेशी गीगीपद मुख्य गायक श्री सुधाकर रामतीर्थ तालुका अथणी जिल्हा बेळगाव आणि श्री महालक्ष्मी नागेशी गीगीपदा गायन संघ राहणार देवरगेनुर तालुका बबलेश्वर जिल्हा विजापूर मुख्य गायक सुजाता यांची कलगी तुर्याचे गाणे होणार आहे
त्याचदिवशी संध्याकाळी ठिक सहा वाजता जंगम महास्वामीजी यांना महाप्रसाद व रात्री ठिक अकरा वाजता सदर बाशिंग मिरवणूकीने देवालयात उराग्नी महापुजा समारंभ संपन्न होणार आहे त्यानंतर पुन्हा कलगी तुर्याचे गाणे होणार आहे
त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक २३/४/२०२६ रोजी सकाळी ठिक नऊ वाजता नंदीध्वजासह श्री मल्लिकार्जुन श्री विरभद्रेश्वर पालखीसह मालदार पुरवंताचे भव्य दिव्य अशी मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे
त्याचदिवशी दुपारी ठिक बारा वाजता अग्निशमन कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे त्याचवेळी श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सव कमिटी सद्भभक्त मंडळ कारकल यांच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे
त्याचदिवशी दुपारी ठिक ४ वाजता भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
यावेळी दुपारी ४ वाजता होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी दुपारी २ ते ३ या कालावधीत नावनोंदणी करण्यात येणार आहे त्यांनंतर येणाऱ्या पैलवानांची नावे घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी अशी यात्रा पंचकमिटीच्या कळवण्यात आले आहे
त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक २३/४/२०२६ रोजी रात्री ठिक १० वाजता श्री अमाजेश्वरी नाट्य संघ रा काकमरी तालुका अथणी जिल्हा बेळगाव यांचे सुंदर कौटुंबिक, सामाजिक कन्नड नाटक जगज्योती बसवेश्वर अर्थात कल्याण क्रांती सुंदर कन्नड नाटक होणार आहे
तरी या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहुन विविध धार्मिक कार्यक्रमांच्या व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मल्लिकार्जुन यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ कारकल यांच्या वतीने करण्यात आली आहे



