सोलापूर

विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये मुद्रित , इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमावरील प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे -निवडणूक जनरल निरीक्षक

जिल्हास्तरीय माध्यम प्रामाणिकरण व संनियंत्रण समितीला निवडणूक जनरल निरीक्षक व जिल्हाधिकारी यांची भेट व कामकाजाची पाहणी

सोलापूर, दिनांक 5:-  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम २०२४ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मुद्रित , इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमावर जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी.) ने अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे व उमेदवारांचा माध्यमातील सर्व निवडणूक खर्च त्यांच्या खर्च नोंदवहीत नोंदवला जाईल यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश अकरा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त सर्व निवडणूक जनरल निरीक्षक यांनी दिले.

    विधानसभा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम २०२४ अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित करण्यात आली आहे.सदर समिती मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पेड न्यूजसह तसेच सोशल मीडियाच्या वापरावरही करडी नजर ठेवण्याचे कार्य करीत आहे.त्यामुळे आज निवडणूक जनरल निरीक्षक अफसाना परवीन , निधी निवेदिता , सादिक आलम , ऋतुराज रघुवंशी, सुबोध कुमार , एमसीएमसी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश नि-हाळी यांनी जिल्हा माध्यम कक्षला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली आणि मार्गदर्शन केले.

     यावेळी जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुनिल सोनटक्के, समिती सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, सदस्य डॉ श्रीराम राऊत, अंबादास यादव, रफिक शेख, गणेश बिराजदार, सचिन सोनवणे आणि समीर मुलाणी आदी उपस्थित होते.

    जिल्ह्यात सध्या ११ विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू असलेल्या निवडणूक काळात माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीची भूमिका ही अतिशय जबाबदारीची आहे.तसेच आज सर्व उमेदवारांकडून समाज माध्यमाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रचारावरही या समितीने काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.विविध वृत्तपत्रात येणाऱ्या संशयीत पेड न्यूज शोधून संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात तो खर्च समाविष्ठ करावा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे समितीने कामकाज करावे.समितीने दैनंदिन पेड न्यूजचा अहवाल खर्च समितीला नियमितपणे सादर करावा आणि समितीचे कामकाज अतिशय जबाबदारीने पार पाडावे अशी सुचना केली.

    इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या टीव्ही युनिट च्या कामकाजाची माहिती,नोंदी व रिपोर्ट कशा पद्धतीने दिला जातो याबाबत युनिटचे प्रमुख रफिक शेख आणि सचिन सोनवणे यांनी सविस्तर माहिती दिली.तसेच सोशल मीडियाचे समन्वयक डॉ.श्रीराम राउत यांनी सोशल मिडिया वर राजकीय पक्ष व उमेदवाराचा छुपा खर्च कशा पद्धतीने काढला जातो याची सविस्तर माहिती दिली.यावेळी अंबादास यादव व गणेश बिराजदार यांनी पेड न्यूज कात्रणे आणि दैनंदिन निवडणूक कार्यालयाला देण्यात येणाऱ्या अहवालाविषयी विस्तृतपणे माहिती दिली.

    जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसार माध्यम वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे.यासाठी माध्यम प्रामाणिकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून उमेदवारांच्या प्रचार जाहिराती, राजकीय जाहिराती यांचे प्रमाणीकरण करण्याचे कार्यवाही केली जाते.पेड न्यूज व जाहिरात पूर्व प्रामाणिकरणाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले असून प्रिंट, इलेक्ट्रॉनिक पोस्ट, सोशल मीडियातील प्रतिनिधीची या अनुषंगाने कार्यशाळा घेण्यात आलेली आहे तसेच सर्व राजकीय पक्षांना पेड न्यूज व जाहिरात पूर्वप्रमाणिकरण याची माहिती देण्यात आली असल्याचे समिती सदस्य सचिव श्री.सुनिल सोनटक्के यांनी तसेच सहाय्यक नोडल अधिकारी अंकूश चव्हाण व किरण गायकवाड यांनी दिली.

   प्रारंभी सर्व निवडणूक जनरल निरीक्षक यांनी समितीच्या कामकाजाची अत्यंत सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी समितीच्या कामकाजाचे प्रत्यक्ष उमेदवार निहाय सोशल मीडियावरील खर्च निवडणूक निरीक्षक यांच्या समोर काढून दाखवण्याबाबत सोशल मीडिया टीमला सूचित केले. त्याप्रमाणेच सोशल मीडिया टीम, टीव्ही रेडिओ युनिट, कात्रणे टीम, पेड न्यूज टीम या सर्व टीमने त्यांच्या स्तरावरून करण्यात येत असलेल्या निवडणूक कामकाजाची अत्यंत बारकाईने निवडणूक निरीक्षक यांना माहिती दिली तसेच सर्व अहवाल त्यांच्यासमोर ठेवण्यात आले.

     यावेळी माध्यम कक्षातील आप्पा सरवळे , सुभाष भोपळे , कासीम जमादार, नागेश क्षिरसागर, अरविंद महाले, कृष्णा घंटे,शरद नलवडे, मिलिंद भिंगारे, ईलीहास ईनामदार, दिलीप कोकाटे, भाऊसाहेब चोरमले, ईकबाल भाईजान, नागेश दंतकाळे, प्रविण चव्हाण, अमोल घाडगे, अतिश हावळे आणि प्रविण बर्दापूरकर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button