सोलापूर
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण तसेच शिकाऊ उमेदवार योजना मेळाव्याचे आयोजन.
सोलापूर, दिनांक 25-:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे (CMYKPY) व शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत मेळाव्याचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर येथे केले आहे.आय. टी. आय. उत्तीर्ण तसेच १२ वी पास, डिप्लोमा, पदवीधर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी सदर मेळाव्याचे आयोजन २७ सप्टेंबर रोजी १० वाजता केलेले आहे.
जिल्हयातील सर्व इच्छुक व प्रशिक्षणार्थी यांनी मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केलेले आहे.