महाराष्ट्र
दै.शिव निर्णय या वृत्तपत्राच्या दिनदर्शिकेचे टेंभुर्णी येथे प्रकाशन

शिव निर्णय/टेंभुर्णी/धनंजय भोसले : टेंभुर्णीतील शिवशंकर हॉटेल येथे दैनिक शिव निर्णय या दैनिकाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते उत्साहामध्ये संपन्न झाले.
यावेळी शिवसेना माढा तालुका प्रमुख मधुकर देशमुख यांनीही दैनिक शिव निर्णय विषयी बोलताना सांगितले की जिल्हासह आपल्या तालुक्यातील वाचकांची या दैनिकाने मने जिंकली.
या प्रकाशन वेळी बोलताना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक मिसकिन म्हणाले की दैनिक शिव निर्णय हे वृत्तपत्र सर्वसामान्याला न्याय देण्याचे व अन्यायाला वाचा फोडणारे दैनिक म्हणून याकडे पाहिले जाते.
टेंभुर्णी ग्रामपंचायतचे मा.सरपंच प्रमोद कुटे यांनीही प्रकाशन वेळी शुभेच्छा देताना म्हणाले की दैनिक शिव निर्णय हे जनतेच्या हक्काचे व्यासपीठ बनले आहे. त्यांनी शिव निर्णय परिवारासह नवीन वर्षाच्या सर्व जनतेला शुभेच्छा ही यावेळी दिल्या.
डी.व्ही.पी. चे चेअरमन औदुंबर देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की या दैनिकाचे पीडीएफ दररोज रात्री एक ते दीड या दरम्यान सर्व जिल्ह्याला पोहोचते हे दैनिक सोशल मीडियाच्या युगामध्ये स्पर्धेमध्ये टिकण्याचे काम दैनिक शिव निर्णय हे करीत आहे या दैनिकाचे संपादकीय वृत्त अतिशय चांगले असून पाण दोन वर गड किल्ल्याची अतिशय चांगली माहिती वाचण्यास मिळत आहे. अल्पावधीतच भरारी घेतलेले हे दैनिक सर्वांच्याच आवडीचे दैनिक बनले आहे.
यावेळी हनुमंत चव्हाण,गणेश केचे, सचिन चव्हाण, सरपंच नवनाथ शिंदे, संजय मिस्किन यांनीही आपले मनोगते व्यक्त केली.
यावेळी माढा तालुका शिवसेनाप्रमुख मधुकर देशमुख, टेंभुर्णीचे मा.सरपंच प्रमोद कुटे, डी व्ही पी चे चेअरमन औदुंबर देशमुख, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक अशोक मिस्कीन, सोनाई दूध संघाचे संचालक गणेश केचे, चव्हाणवाडीचे सरपंच नवनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका उपाध्यक्ष हनुमंत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस युवक माढा तालुका उपाध्यक्ष संजय मिस्किन,अँड सचिन चव्हाण,चव्हाणवाडी सोसायटीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, युवा नेते विजय कदम, सुवर्ण क्रांतीचे मॅनेजर आशिफ काझी, गणेश नांगरे, जयलिंग रायपुरे, व सुजित बंगाळे यांच्या उपस्थिती मध्ये दैनिक शिव निर्णय या दैनिकाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.