March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

बदली ड्रायव्हरचा मुलगा झाला आय इ एस सोलापूरातुन कौतुकाचे वर्षाव

बदली ड्रायव्हरचा मुलगा झाला आय इ एस सोलापूरातुन कौतुकाचे वर्षाव

शिवनिर्णय /सोलापूर : शेळगी सोलापूर शहरातील रहिवाशी राभूलिंग कत्ते यांचा मुलगा प्रसन्न हा आय इ एस झाला असून दैनिक शिव निर्णय कार्यालयात मान्यवरांचे उपस्थित सत्काराचे आयोजन कारन्यात आले होते.

आर्थिक परिस्थितीस सामोरे जात मुळचे सांगली जिल्ह्यातील जतचे रहीवाशी प्रभूलिंग कत्ते हे उपजीवीकेसाठी सोलापूर येथे मिळेल ते काम करीत स्थलांतरीत झाले. त्यांच्या पोटी समस्त मानव जातीला प्रसन्न करणारा  प्रसन्न नावाचा रत्न उदयास आला त्याची जिद्द व चिकाटी पाहून वडील प्रभूलिंग कत्ते हे मिळेल ते काम करीत मुलाच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी अहोराञ झटले त्यांचे चिरंजीव प्रसन्न कत्ते हे पहीली ते पाचवी शिक्षण मुळ गाव जत येथून घेत माध्यमिक शिक्षण ब्रह्नमठ होटगी शिक्षण संस्था एम आय डी सी अक्कलकोटरोड येथून पुर्ण केले व शासकिय अभियांञीक काॅलेज मधून डिप्लोमा पदवी संपादन करुन भारतीय इंजिनिअरिंग सेवेत महाराष्ट्र राज्यातुन अव्वल नंबरने उत्तीर्ण झाले या यशाने  सोलापुर व सांगली जिल्ह्यातुन कौतुकाचे वर्षाव होत आहे. विशेषता अल्प अपंगत्वावर मात करीत प्रशासकीय सेवेत सेवा करण्याची जिद्द त्यानी पुर्ण करुन दाखवले या यशाची  प्रेरणा आज समस्त युवकाना घेण्याची गरज आहे नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा आपल्यातील निद्रा अवस्थेतील जिद्द व सकारात्मक क्रयशक्तीला जागण्याचा प्रयत्न करावे मग कोणतीच यश हे अशक्य वाटणार नाही असे संबोधन श्री प्रसन्न कत्ते यांनी दै.शिवनिर्णय येथील कार्यालयाच्या वतीने सत्कार स्विकारताना केले. यावेळी दै.शिवनिर्णयाचे संपादक अनिल शिराळकर व्यवस्थापक जगदिश कोरे प्रा.शिवलिंग अचलेरे  उपसंपादिका श्रीमती स्वाती धोञी, विष्ववार्ताचे संपादक विकास कस्तुरे साप्ताहीक देंवाग संदेशचे संपादक विजयकुमार झुंझा जिल्हा प्रतिनिधी वैजिनाथ बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होत.