सोलापूर

कर्जमुक्ती योजनेच्या तिसऱ्या यादीत जिल्ह्यातील ६ हजार ५५९ शेतकरी पात्र

 

कर्जमुक्ती योजनेच्या तिसऱ्या यादीत जिल्ह्यातील ६ हजार ५५९ शेतकरी पात्र

 

 

सोलापूर : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी नुकतीच जाहीर झाली असून, या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यातील तब्बल ७८० गावांमधील ६ हजार ५५९ शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली.

या यादीमध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकशी संबंधित १७ शेतकऱ्यांचाही समावेश असून, त्यांचे एकूण १६ लाख ६९ हजार ४०० रुपयांचे कर्ज या योजनेअंतर्गत माफ होणार आहे. यामुळे सततच्या नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कधी दुष्काळ तर कधी अतिवृृृृष्टी यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला होता. पीक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या या कर्जमुक्ती योजनेमुळे पुन्हा उमारी मिळण्यास मदत होणार आहे.

पात्र ठरलेल्या शेतकन्यांच्या कर्जखात्यावर थेट मदतीची किंवा कर्जमुक्तीची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया आता अंतिम टण्यात आली आहे. तिसऱ्या यादीच्या घोषणेमुळे विल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांमध्ये व ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून, उर्वरित्त शेतकऱ्यांच्या नावांची यादीही लवकरच जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button