सोलापूर

महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजची ज्ञानेश्वरी देशमुख टेंभुर्णी केंद्रात सर्वप्रथम

माढा तालुक्यात महात्मा फुले विद्यालयाची १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम

टेंभुर्णी / धनंजय भोसले : टेंभूर्णी ता. माढा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, बारावी बोर्ड परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा १००% निकाल लागला असून महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज ने उत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. टेंभुर्णी केंद्रात व टेंभुर्णी परिसरातील कॉलेज मध्ये विज्ञान विभागात फक्त महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज चाच  निकाल हा १००% लागला आहे. ज्ञानेश्वरी देशमुख, प्रथमेश गवळी व श्रुती दळवी यांनी टेंभुर्णी केंद्रात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकावला आहे. विज्ञान विभागामध्ये १०९ पैकी ४३ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

                विज्ञान विभागामध्ये ज्ञानेश्वरी देशमुख हिने ८५.६७% गुण मिळवून टेंभुर्णी केंद्रात प्रथम क्रमांक, प्रथमेश गवळी याने ८१.५०% गुण मिळवून टेंभुर्णी केंद्रात व्दितीय क्रमांक तर श्रुती दळवी हिने ८१.००% गुण मिळवून टेंभुर्णी केंद्रात तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे माढा तालुक्याचे आमदार मा. अभिजित आबा पाटील, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे, जिल्हा परिषद सोलापूर महिला व बालकल्याण सभापती ॲड.अमृताताई वाघे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.नारायण भानवसे, विद्यालयाचे प्राचार्य. विजय यादव, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक. शोएब बागवान, संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
चौकट
“प्रयत्न, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावरच ग्रामीण भागात अशा प्रकारचे घवघवीत यश संपादन करता येते हे खूप कौतुकास्पद आहे. महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजने टेंभुर्णी व परिसरात गुणवत्तेचा नवा मापदंड निर्माण केला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!”
 नारायण भानवसे
 संस्थापक अध्यक्ष
 महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button