March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते उदघाटन

चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते उदघाटन

रायगड दि.20:-  रायगड जिल्ह्यातील  चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन पॉलिटेक्निक महाविद्यालय पेण येथे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते व रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थित संपन्न झाले.

राज्यातील १ हजार चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे  ऑनलाईन उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व उपमुख्यमंत्री  देवेंद फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थित आज  वर्धा येथे संपन्न झाले. त्याचे थेट प्रक्षेपण जिल्ह्यातील 26 महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.

पेण येथे आयोजित या कार्यक्रमांस  सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास,अमिता पवार, प्रांतधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, महाविद्यालय प्राचार्य, स्टाफ व विधार्थी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात एकूण २६ ठिकाणी ही केंद्र कार्यरत असणार आहेत.सदर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामधून उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,2020 मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. त्या धोरणाच्या अमंलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच युवक युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहेत.