महाराष्ट्र
भागवत वारकरी संप्रदायाच्या वतीने ह भ प मोहनानंद महाराज यांना राज्यस्तरीय पुरस्कार

देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते ह भ प मोहनानंद महाराज यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
शिव निर्णय/ माळशिरस
पुरंदावडे गावचे सुपुत्र श्री. ह. भ. प. मोहनानंद महाराज पुरदांवडेकर हे श्री. स.स. तुकाराम कवले महाराज मठ जुनोनी तालुका मंगळवेढा यांचे शिष्य असून ते १९८६ सालापासून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराज, मध्य प्रदेश इत्यादी राज्यात वारकरी संप्रादायाच्या माध्यमातून निरपेक्ष भावनेने ज्ञानाची विक्री न करता किंवा कथा किर्तन न विकता समाज जे काही येण्या-जाण्या करीता जे दान देतात त्यादानावरती ते समाधानी असतात. गेली ३४ वर्षे ज्ञानदानाच्या कार्यातून अंधश्रध्दा निर्मुलन, व्यसनमुक्तता, पर्यावरण, पाणी आडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा, संतुलन, स्त्री भ्रूण हत्या, दारू बंदी, हुंडा बंदी, देशाची एकात्मता, संत साहित्य व संविधान यांचा घनिष्ठ संबंध अशा सर्वच स्तरातून विचार मांडून अध्यात्म व सायन्स किंवा ज्ञान व विज्ञान यांचा संबंध किती जवळचा आहे. हे मार्मिक पणे पटवून देतात. आपल्या वक्तृव सैलीने ते समाजातील धर्मभेद व जातीभेद कसा घालवता येईल. याचा विचार करतात. हजारो तरुण युवक किर्तनाची प्रेरणा घेऊन व्यसनातून मुक्त होतात, तर अंधश्रध्देबद्दल नवशे जरी पुत्र कन्या होती तरी का करणे लागे पती या संत तुकाराम महाराजाच्या अभंगांतील उक्तीने अभंगांचा सिद्धांत देऊन तंत्र मंत्र, जादुटोणा, भूत पिशाच, बुवा बाजी यावर विश्वास न ठेवता डोळस श्रध्दा ठेवा असा समाजाला संदेश देतात. खरे तर मोहनानंद महाराजांचे किर्तन म्हणजे विचार मत परिवर्तनाचे रामबाण औषध आहे असे वाटते.
असा सर्व वारकरी संप्रादायाच्या कार्याचा आढावा घेऊन भागवत वारकरी संप्रादायाच्या वतीने देशाचे नेते मा. श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते श्री हभप. मोहनानंद महाराजांचा सन्मान पत्र देऊन राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत केले है ऐकल्यावर गावच्या भूमी पुत्राबद्दल आदर व्यक्त होत आहे. तसे मोहनानंद महाराजांना असे अनेक सामाजिक पुरस्कार नेहरू युवा पुरस्कार धुळे असे भेटले आहेत. पण हा पुरस्कार भागवत वारकरी संप्रादाया मार्फत भेटला याचा सार्थ अभिमान आहे.
One attachment • Scanned by Gmail