सोलापूर
देगाव येथे अमर रतिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य सभा संपन्न

देगाव, दक्षिण सोलापूर:
२५१ दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. अमर रतिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आज संध्याकाळी देगाव येथे भव्य सभा उत्साहात संपन्न झाली.
धनगर समाजाचा भक्कम पाठिंबा
या प्रसंगी धनगर समाजाचे बुलंद आवाज आदरणीय बाळासाहेब मामा बंडगर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना अमर पाटील यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. त्यांनी जाहीर पाठींबा व्यक्त करत सभेला गाजवले. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिवर्तनासाठी प्रबळ मागणी
मा. गणेश दादा वानकर यांनी आपल्या भाषणातून देगावकरांनी अमर पाटील यांच्या पाठिशी उभे राहून मतदारसंघात परिवर्तन घडवावे असे सांगितले. यंदाचा विजय विकासाचे नवे पर्व घेऊन येणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
याचप्रमाणे, श्री. अमोल गावडे यांचाही जाहीर पाठींबा या सभेद्वारे मिळाला, ज्यामुळे मतदारसंघातील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या सभेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थितांमध्ये मा. दत्तापंत वानकर, गणेश दादा वानकर, भीमराव बाळगे, बिडवे सर, रशीद शेख, कीरण सुर्वे, सिद्धू खरात, सुधीर लांडे साहेब, विठ्ठल म्हमाणे, पांडुरंग वाघ, सुधाकर काळे, लहूजी गायकवाड, सिद्धू कस्तुरे, भारत मेकाले (पैलवान), धोंडीराम भोसले, भारत नाना घुले, शाशिराजे शेळके, गुरन्ना कारले, रामराजे पवार, वजीर शेख, महिला आघाडीच्या सौ. परिणीती शिंदे आणि प्रभाकर कोठे या व्यक्तींचा समावेश होता.
अमर पाटील यांची वचनबद्धता
सभेच्या शेवटी अमर रतिकांत पाटील यांनी सभेला संबोधित करत बाळासाहेब मामा बंडगर यांचे विशेष आभार मानले आणि विकासाची शपथ घेतली. त्यांनी वचन दिले की, आमदार झाल्यावर प्रलंबित विषय मार्गी लावणे, गावोगावी मूलभूत सुविधा पुरवणे आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट असेल.
मतदारांमध्ये उत्साह सभेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये परिवर्तनाच्या नव्या लढ्याची ऊर्जा दिसून आली. देगाव परिसरात अमर पाटील यांच्या विजयाच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले.