सोलापूर

लऊळ येथील डॉ.अनुराग नलवडे यांना एम.बी.बी.एस.पदवी बहाल”

लऊळ येथील डॉ.अनुराग नलवडे यांना एम. बी. बी. एस. पदवी बहाल “
कुर्डू प्रतिनिधी :  ( बाळकृष्ण कापरे ) डॉ. अनुराग स्वाती मोहन नलवडे यांनी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स या प्रतिष्ठित विद्यापीठातून बॅचलर इन मेडिसिन M.B.B.S ही पदवी संपादन करून आपल्या कर्तुत्वाची उज्वल छाप उमटवली आहे. अनुरागचे प्राथमिक शिक्षण जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिर कुर्डूवाडी येथे, तर माध्यमिक शिक्षण श्री कुर्मदास विद्या मंदिर लऊळ येथे पूर्ण झाले. वडील न्यू इंग्लिश स्कूल पिंपळखुटे येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत तर आई गृहिणी अशा साध्या पण संस्कार मूल्यांनी समृद्ध कुटुंबातून त्याची जडणघडण झाली.
लहानपणापासूनच अभ्यासासोबत खेळाची ही आवड होती. शांत व संयमी स्वभाव ही त्याची खास ओळख.
इयत्ता दहावी मध्ये 88.88% गुण मिळवून व बारावी मध्ये 90 टक्के गुण मिळवले. सीईटी सारख्या परीक्षेमध्ये 99.99 महाराष्ट्र राज्यात आठवा क्रमांक मिळवून यश संपादन केले. अनुरागने सातत्यपूर्ण प्रगती करून दाखवली. राष्ट्रीय स्तरावरील NEET सारख्या अवघड परीक्षेमध्ये 720 पैकी 561 गुण मिळवून त्यांनी वैद्यकीय शिक्षणाची दारे उघडली.
एम.बी.बी.एस शिक्षण काळात प्रत्येक वर्षी प्रथम श्रेणीत यश मिळवत अंतिम वर्षात फर्स्टक्लास डिस्टिकशन मिळवून त्यांनी आपल्या जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक परिश्रमाची साक्ष दिली.ग्रामीण भागात शिक्षण घेत असूनही उच्चभुमतेचा ध्यास घेत अनुराग उर्फ यश यांनी खऱ्या अर्थाने यशाचे शिखर गाठले आहे.त्याचीही प्रेरणादायी वाटचाल अनेक विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरणारी आहे
अनुराग उर्फ यशने मिळवलेले हे उत्तुंग यश केवळ त्याच्या परिश्रमाचे फल नाही तर त्याच्यामागे कुटुंबातील सर्व थोरामोठ्यांचे आशीर्वाद नातेवाईक व पाहुण्यांचे मोलाचे सहकार्य आणि आजी-आजोबांची पुण्याई हीच खरी प्रेरणाशक्ती ठरली आहे .या सर्वांच्या प्रेम पाठबळ आणि सदिच्छा मुळेच यशने यशाचे शिखरावर झेप घेतली आहे.लऊळ व परिसरातून त्यांचे फार कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button