महाराष्ट्र

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सत्कार

सोलापूर, दि. 8:- माहे जुलै 2023 ते आज रोजी पर्यंत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत तत्परतेने कामकाज केल्याबद्दल विशेषतः दिव्यांगाच्या कल्याणाच्या योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने  पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी व जिल्हा संपर्कप्रमुख जमीर भाई शेख यांनी पुष्पहार देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार केला.

      यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी, जिल्हा संपर्कप्रमुख जमीरभाई शेख, शहर कार्याध्यक्ष खालीद मणियार , दक्षिण तालुका अध्यक्ष सिद्धाराम काळे , रियाज सुगुर हे उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यापासून कार्तिकी वारी 2023 ही स्वच्छ वारीचे आयोजन, टंचाई काळात उपाययोजना राबवणे, शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून 25% अग्रीम मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका, अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे, रेनगर प्रकल्पाचे घरकुल वितरण कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री महोदय यांच्या दौऱ्याचे यशस्वी आयोजन, टंचाई काळात उजनी धरणातून पाणी वितरण, सोलापूर महापालिकेचा अतिरिक्त पदभार स्वीकारल्यानंतर दुहेरी पाईपलाईन साठी केलेले प्रयत्न, जिल्ह्याच्या पर्यटनासाठी करत असलेल्या उपायोजना, आषाढी वारी 2024 चे यशस्वी आयोजन, जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी करत असलेले प्रयत्न तसेच दिव्यांगाने साहित्य वाटप करण्यासाठी घेण्यात आलेला मिळावा तसेच दिनांक 19 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन आदी विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हा सत्कार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख जमीर भाई शेख यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button