सोलापूर

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना मेळाव्याचे आयोजन

सोलापूर दि.20 :- डिजीटी नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे (CMYKPY) व शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळाव्याचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड सोलापूर येथे करण्यात आलेले आहे.

      आय. टी. आय. उत्तीर्ण तसेच 12 वी पास, डिप्लोमा – पदवीधर पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी हा मेळावा घेण्यात येत असून सोलापूर जिल्हयातील सर्व आस्थापना व प्रशिक्षणार्थी यांनी मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button