रायगड

रायगड जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीसाठी विशेष शिबिराचे आयोजन  

रायगड :- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 01जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघाची प्रारूप मतदार यादी  जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतर्गत सर्व मतदान केंद्रावर, सर्व  मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इ. ठिकाणी आज दि. 6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्व मतदारसंघात युवा, महिला दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. किशन जावळे यांनी दिली.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे यांच्या हस्ते सर्व राजकीय पक्षांना प्रारूप मतदार यादीचे वितरण करण्यात आले. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी उपस्थित होते.

प्रारूप मतदारयादी आज दि 6  ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या  कालावधीत दावे व हरकती नोंदविण्यात येईल व दावे व हरकती या  29 ऑगस्ट पर्यंत निकाली करण्यात येणार आहेत. तसेच  अंतिम मतदार यादी 30 ऑगस्टला प्रसिद्ध होणार असल्याचे ही श्री जावळे यांनी यावेळी सांगितले.

  जिल्ह्यात सर्व मतदारसंघात युवा, महिला दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीसाठी विशेष शिबिराचे दि. 10 व 11 ऑगस्ट तसेच 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व राजकीय पक्ष यांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (Booth Level Agent -BLA) यांची नेमणूक करावी. तसेच प्रत्येक BLA मार्फत एका दिवशी 10 अर्ज स्वीकारण्यात येतील व संपूर्ण पुनःरीक्षण कालावधीत जास्तीत जास्त 30 अर्ज स्वीकारण्यात येतील असेही श्री जावळे यांनी यावेळी सांगितले.

तरी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये मतदाराचे नाव, घराचा पत्ता, फोटो, दुरुस्ती, मयत, स्थलांतरित मतदारांची वगळणी  इ. बाबत हरकती व सूचना असल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे दि. 20 ऑगस्ट पुर्वी हरकती दावे दाखल करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड किशन जावळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button