अक्कलकोटच्या इतिहासात प्रथमच डेरेदार झाडांचे पुनःप्रत्यारोपण
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या “पर्यावरणपूरक विकसित अक्कलकोट शहर” या उद्दिष्टाला अनुसरून नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा अभिनव उपक्रम

*अक्कलकोटच्या इतिहासात प्रथमच डेरेदार झाडांचे पुनःप्रत्यारोपण*
*आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या “पर्यावरणपूरक विकसित अक्कलकोट शहर” या उद्दिष्टाला अनुसरून नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा अभिनव उपक्रम*
अक्कलकोट : अक्कलकोट शहराच्या इतिहासात प्रथमच डेरेदार झाडांचे पुनःप्रत्यारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या “पर्यावरणपूरक विकसित अक्कलकोट शहर” या उद्दिष्टाला अनुसरून नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रत्यक्षात साकार झाला असून शहरभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
सध्या एमएसईबी चौक ते बायपास रोड या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान रस्त्यालगतची जुन्या पिंपळ-वडाची डेरेदार झाडे तोडली जात असल्याचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि झाडे पूर्णपणे तोडण्याऐवजी त्यांचे पुनःप्रत्यारोपण करण्याचे आदेश दिले.
नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार अंदाजे १२ ते १३ डेरेदार झाडे क्रेनच्या सहाय्याने काळजीपूर्वक उपटून शहरातील विविध भागात स्थलांतरित करण्यात आली. ज्या ठिकाणी झाडांची योग्य वाढ होईल आणि पर्यावरणाला अधिक फायदा होईल अशा ठिकाणी ही झाडे पुन्हा लावण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेली इतर डेरेदार झाडे देखील भविष्यात अशाच पद्धतीने स्थलांतरित करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार असल्याच्या सूचना नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अक्कलकोट नगरपरिषदचे मुख्याधिकारी रमाकांत डाके साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने पार पाडण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून, अक्कलकोट शहरासाठी हा उपक्रम एक आदर्श ठरत आहे.

