महाराष्ट्र

जिल्ह्यात २० मे रोजी औषध दुकाने बंद

 

सोलापूर जिल्ह्यात २० मे रोजी औषध दुकाने बंद

सोलापूर, :
सोलापूर जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट संघटना यांनी जाहीर केले आहे की, २० मे २०२६ रोजी जिल्ह्यातील औषध दुकाने बंद राहणार असून ते ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या एक दिवसीय बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

रुग्णांच्या सोयीसाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या सोलापूर कार्यालयामार्फत एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. औषधाअभावी कोणत्याही रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांनी औषध उपलब्धतेसंदर्भात संपर्क साधण्यासाठी खालील क्रमांक वापरावा: सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, सोलापूर – 9552926113

बंदच्या कालावधीत तालुकानिहाय सुरू ठेवण्यात येणाऱ्या औषध दुकानांची यादी व संपर्क क्रमांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त (औषधे) अ.स. गोडसे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button