देश - विदेश

नसरापूर घटनेचा तीव्र निषेध, आरोपीला जबरी शिक्षा द्या… शिवसेनेची मागणी 

 

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – सोलापूर शहर मध्य नसरापूर घटनेचा तीव्र निषेध, आरोपीला जबरी शिक्षा द्या… शिवसेनेची मागणी

नसरापूर (ता.भोर) येथे अवघ्या चार वर्षीय निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणाचा निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – सोलापूर शहर मध्यच्या वतीने मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, मा. निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

सदर निवेदनाद्वारे आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS), POCSO कायदा व इतर कठोर कलमान्वये तात्काळ कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी करण्यात आली. तसेच पीडित बालिका व तिच्या कुटुंबाला संरक्षण, वैद्यकीय मदत व आर्थिक सहाय्य देण्याची मागणीही करण्यात आली.

शहरप्रमुख नाना मोरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ जिल्हा पोलिस प्रमुख शिरीष हुंबे, जिल्हाधिकारी कार्यालयात आरडीसी अभिजीत पाटील याना निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक प्रा.अजय दासरी यांनी संतप्त भावना व्यक्त करत म्हटले की, “नसरापूरसारख्या घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा नराधम आरोपींना कायद्याने जबरी शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा विकृत कृत्याचे धाडस करणार नाही. प्रशासनाने या प्रकरणात जलद आणि कठोर कारवाई करून समाजात कायद्याचा धाक निर्माण करावा.”

यावेळी शहरप्रमुख नाना मोरे, अशोक बोकेवाले, रेवण शिखरे, सोमनाथ तोडकरी, सोनाली चव्हाण, सुनंदा पवार, राहुल भणगे, विजय जतकर, सुमित भांड्येकर, अतारी सुपाते, उमाकांत सुपाते, गौतम खंदारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button