सामाजिक उपक्रम
गरीब गरोदर ऊस तोड महिलेस जीवनदान

शिव निर्णय / कुर्डूवाडी / विनायक दीक्षित : ऊस तोड कामगार असणाऱ्या गरोदर महिलेवर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डाॅक्टर्स व स्टाफ यांनी प्रसंगावधान व गांभीर्य ओळखून तातडीने उपचार केल्याने तिला जीवदान मिळाले. याबद्दल शहरात डाॅक्टर्स व सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैशाली ज्ञानेश्वर सोनवणे ( वय २३ ) रा. रामपूरवाडी, जि. छत्रपती संभाजी नगर ही गरोदर महिला ऊस तोडणीसाठी कव्हे ता. माढा परिसरात आली होती.दरम्यान तिला दि. २६ रोजी त्रास होऊ लागला व रक्तस्त्राव सुरु झाला तेव्हा त्यांनी कुर्डूवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी निघाले. परंतु त्या सिरियस असल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले .रुग्णालयात आणता समयी तिचा रक्त दाब खूप कमी झाला होता व तिचे रक्त ५ ग्रॅम होते तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे रिपोर्ट नव्हते
,तरी प्रसंगावधान राखून वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनंदा रणदिवे यांनी तात्काळ डॉ प्रद्युम्न सातव,डॉ सुप्रिया काळे,स्टाफ नर्स सुनीता गिराम यांच्या सहकार्याने रुग्णावर उपचार सुरु करीत डॉ. नितीन भोरे व डॉ. सचिन माढेकर यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे बोलावून घेतले.तातडीने रक्त मागवून रुग्णाला देऊन पुढील उपचार करून मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढून रुग्णाचे प्राण वाचवले .
यावेळी स्टाफ नर्स मनीषा ढाकणे, गोविंद शिंदे, ऋतुजा फंड, अजय थोरबोले,गणेश बागल आदींचे सहकार्य लाभले .