March 11, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

सोलापूर आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागा रिपाईसाठी मागणी करणार

मोहोळ (तालुका प्रतिनिधी ) सोलापूर आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागा रिपाईसाठी मागणी करणार असून रिपाई सोलापूरचे उमेदवार रिपाईचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे असतील अशी माहीती रिपाईचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली

        मोहोळ येथील पंढरपूर रोडवर असलेल्या हॉटेल अजिक्यतारा या ठिकाणी रिपाईच्या वतीने प्रत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भोसले हे बोलत होते याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस शामसुंदर ( रवि ) गायकवाड सिद्धार्थ बनसोडे विठठल क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना सोमनाथ भोसले म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर हे १६ डिसेंबर १९५६ रोजी मुंबई येथे रेस कोर्स मैदानावर धम्मदिक्षा सोहळा घेणार होते परतु ६ डिसेबर रोजी त्यांचे महपरिनिर्वाण झाले ते अपूर्ण राहिलेले काम देशाचे केंद्रीय मंत्री खा रामदास आठवले हे करित असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात येणार आहे या धम्म परिषदेस इतर देशातील बौद्ध बांधव उपस्थित राहणार आहेत सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील असा प्रयत्न असून बौद्ध उपासकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले .यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.