रायगड दि.28:- सैनिक कल्याण विभाग- पुणे यांनी केंन्द्रिय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्या संदर्भिय पत्रान्वये जिल्हा सैनिक बोर्ड या ठिकाणी माजी सैनिकांना स्पर्श पोर्टल (Sparsh Portal) अडचणी येत असल्याने कॉमन सर्विस सेंटरची स्थापन केली आहे. तरी कॉमन सर्विस सेंटरचालवणेसाठी इच्छूक माजी सैनिकांना डिजीआर द्वारे मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येईल.
तरी रायगड जिल्हयामधील इच्छूक माजी सैनिकांनी CSC केंन्द्र स्थापन करणेसाठी डिजीआर https://dgrindia.gov.in/ या संकेतस्थळावर माजी सैनिकांनी नोंद केली असेल तर आपली नावे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रायगड-अलिबाग येथे दोन दिवसात सादर करावेत. असे आवाहन ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.



More Stories
गेल्या ३२ वर्षांपासून प्रलंबित एम.फिल. अर्हताधारकांचा प्रश्न सोडवल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार
नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पेण येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबीर