March 22, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

नेताजी प्रशालेत संविधान दिन व  शाहिद दिन उत्साहात

नेताजी प्रशालेत संविधान दिन व  शाहिद दिन उत्साहात
शिव निर्णय / सोलापूर  : नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत भारतीय संविधान  दिन व शाहिद दिन उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रविशंकर  कुंभार होते .प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले उपस्थित होते.प्रथम  डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहिद अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे,राजकुमार मरगुरे,उमदेवी कुंभार व ज्ञानेश्वर म्हेत्रे उपस्थित होते. प्रतिमा पूजनानंतर संविधानाची शपथ घेण्यात आली.
भावना येमूल, अक्षता कंनकट्टी, स्वप्निल स्वामी, सृष्टी माळी, स्नेहा स्वामी व भाग्यश्री नागेल्ली विद्यार्थ्यांनी भाषण केले.माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे,राजकुमार मरगुरे, ज्ञानेश्वर म्हेत्रे व उमादेवी कुंभार यांनी मनोगतातून संविधानचे महत्त्व सांगितले.
अध्यक्षिय भाषणात प्राचार्य रविशंकर कुंभार म्हणाले,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिल्यामुळेच जगभरात भारतीय संविधान श्रेष्ठ आहे. कायद्यांवरच देशाची वाटचाल चालू आहे. तसेच २६/११ च्या घटनेत भारतीय शूर वीर अधिका-यांनी सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी शहिद झाले. त्यांचे सर्व भारतीयांना अभिमान असल्याचे सांगून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले तर इरणा कलशेट्टी यांनी आभार मानले.