सोलापुर – सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सर्वांचा आवडता गायन रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल पुन्हा एका नव्या हंगामासह परतला आहे.आपल्या आगामी आवृत्तीत सादर करता अशा झकास गुणवंतांचा शोध सध्या सुरू आहे.उभरत्या गायकांना त्यांची कला सादर करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देत मालिकेचे निर्माते आता स्वप्नांचे शहर-मुंबईत आगामी सिंगिंग सुपरस्टारच्या शोधात निघाले आहेत.जर तुमच्यातही गीत-संगीताविषयी असीम प्रेम अन् जिद्द असेल तर आणि तुमचे गायन कौशल्य दाखवण्यासाठी तुम्ही संधीच्या शोधात असाल तर २७ ऑगस्ट २०२३ ला ऑडिशन द्यायला या.पत्ता आहे – नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर्स अमृतशक्ती, चांदिवली फार्म रोड,ऑफ साकीनाका रोड,अंधेरी पूर्व, मुंबई-४०००७२.यंदाच्या सीझनमध्ये इंडियन आयडॉल तुम्हाला एका अद्भूत प्रवासावर नेणार आहे.जेथे देशातील सर्वोत्तम गुणवंत गायक अनुभवायला मिळतील.आशावादी स्पर्धकांना त्यांची स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी या संधीचा पुरेपूर लाभ उठवण्यासाठी प्रेरित केले जाईल.इतकेच नव्हे तर देशाचे भावी लाडका गायक बनण्याचीही संधी त्यांना मिळेल.



More Stories
शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रथम प्रदर्शित
सोनी मराठीवर नवी मालिका ‘जय जय शनिदेव’
जिल्ह्यात 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन