March 11, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

टेंभुर्णी ग्रामपंचायतीवर महिला राज उपसरपंच पदी राजश्री नेवसे यांची निवड

टेंभुर्णी ग्रामपंचायतीवर महिला राज उपसरपंच पदी राजश्री नेवसे यांची निवड
शिव निर्णय / टेंभुर्णी : टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये 22 नोव्हेंबर रोजी उपसरपंच पदाची निवड करण्यात आली यामध्ये  उपसरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल झाले असताना बाळासाहेब आजिनाथ ढगे यांचा व राजश्री सतीश नेवसे यांचा अर्ज आल्याने बाळासाहेब आजिनाथ ढगे यांना सूचक व अनुमोदक मिळाला नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला राजश्री नेवसे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. जनतेच्या सरपंच असलेल्या सुरजा बोबडे यांनी ग्रामपंचायतीचा पदभार हाती घेतल्यापासून त्यांनी गाव सुजलम सुपलम करण्याचे धोरण ठरविले आहे. त्यांच्या साथीला आता राजश्री नेवसे आल्याने या ग्रामपंचायतीवर महिला राज असल्याचे दिसत आहे.
टेंभुर्णी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये बोबडे गटाचे दहा देशमुख गटाचे सहा व कुठे गटाचे एक असे सदस्य असून आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीच्या कार्यक्रमांमध्ये 10 जागा जिंकून आलेल्या बोबडे गटाकडून राजश्री सतीश नेवसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड लोकनियुक्त सरपंच सुरजा बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी बोबडे गटातीलच बाळासाहेब आजिनाथ ढगे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारी अर्जला सुचक नसल्या कारणाने त्यांचा अर्ज बाद झाला. दुपारी दोन वाजता राजश्री नेवसे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी बोबडे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत, गुलालाची उधळन केली.
निवडीनंतर बोबडे गटाच्या व देशमुख गटाच्या वतीने ही नूतन सरपंच व उपसरपंचचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोबडे गटप्रमुख योगेश बोबडे, ऋषिकेश बोबडे, दशरथ देशमुख, संदीप देशमुख, अतुल देशमुख, अनंत पोतदार, सुधीर पाटील, नामदेव धोत्रे, संतोष वाघमारे रमेश लोंढे, हरिभाऊ सटाले, डॉ.सयाजी देशमुख, ॲड. रुपेश बोबडे, विकास धोत्रे, विनोद देशमुख, नागेश बोबडे, जयवंत पोळ, औदुंबर महाडिक, राम पवार, शांतीलाल कुटे, योगेश मुळे, नूतन ग्रामपंचायत सदस्य तुकाराम डोके, कैलास सातपुते,राम पवार, सोमनाथ ताबे, नागनाथ वाघे, अमर कांबळे, लखन हवालदार, रूपमती राजाराम थोरात, विद्या शैलेश ओहळ, मुक्ताबाई गुरुलींग पाटील, सचिन नीलकंठ होदाडे, सईबाई वैभव महाडिक,आरती लखन पवार, प्रतिभा खरात यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.