वागदरी : वागदरीच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती तेजाबाई शिवाजीराव मिटकर यांनी चारधाम यात्रेसाठी मुलांनी दिलेली पंचवीस हजार रुपयांची रक्कम जि.प.प्रा.शाळेच्या विकासासाठी दिली.
मिटकर कुटुंबीयांनी वागदरी गावासाठी दिलेले योगदान पाहून ग्रामस्थांनी वर्षभरापूर्वी तेजाबाई मिटकर यांना सरपंच पदी बसवले.मागील वर्षभरात श्रीमती मिटकर यांनी गावांमध्ये बंदिस्त नाली,शाळा सुशोभीकरण, ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण,स्ट्रीट लाईट,सिमेंट बंधारा ईत्यादी कामांची सुरुवात करून लोकार्पण ही केले. गावामध्ये चोवीस तास स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याच्या हर घर नल योजनेच्या सत्तेचाळीस लाखांच्या पाईपलाईन योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.तसेच मराठा स्मशानभूमी पेव्हर ब्लॉक बसवणे,मुस्लिम स्मशानभूमी सिमेंट रस्ता आदि कामांचे भूमिपूजन झाले आहे.तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता मंजूर झाला आहे.
शासनाने दि.30 नोव्हेंबर 23 च्या शासन निर्णयाने राज्यभरात “मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा”हे अभियान सुरू केले आहे या अभियानात क्रमांक आणायचा निर्णय वागदरी ग्रामस्थांनी केला आहे.अल्पावधीतच याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे यासाठी सरपंच तेजाबाई मिटकर यांनी 25 हजार रुपये देऊन या अभियानाची सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनी हे अभियान यशस्वी करण्याच्या निर्णयाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.




More Stories
“कॅण्डेल लाईट व्हिजील” अर्थात एचआयव्ही / एड्स या आजाराने दगावलेल्या पी.एल.एच.आय. व्ही व सी.एल.एच.आय. व्ही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
शहीद अशोक कामटे विचारमंचचे भव्य रक्तदान शिबीरात १३८ जणांचे रक्तदान आणि नेत्ररोग शिबीरात १६८ जणांची तपासणी