सोलापूर : घटस्फोटासाठी आलेले पती-पत्नी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नामुळे दिवाळीनिमित्त एकत्र करण्यात यश आले आहे.
शुक्रवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील मध्यस्थी केंद्रामध्ये वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश पी. ए. कुंभोजकर यांनी मध्यस्थीकरीता अर्जदार व सामनेवाली यांना व त्यांच्या विधिज्ञ यांना पाठि अर्जदाराने सामनेवाली यांच्या विरुध्द हिंदू विवाह कायदा 1955 चे कलम 13 अन्वये विवाह विच्छेद (घटस्फोट) साठी प्रकरण वरिष्ठ न्यायालयात दाखल केले.
अर्जदार हे मोहोळ तालुक्यातील राहणारे असून सामनेवाली ही वाशी तालुक्यातील आहे. अर्जदाराचा विवाह 2021 मध्ये झाला. लग्नानंतर त्याची पत्नी सामनेवाली ही अर्जदारासोबत काही दिवस चांगल्या प्रकारे नांदली. दरम्यानच्या काळात ती पतीजवळ नांदत असताना व्यवस्थित न बोलणे, घरात कामधंदा न करणे, घरातील लोकांना उलट सुलट बोलणे, पतीबरोबर वारंवार भांडण करणे, त्यांच्यावर संशय घेणे अशा प्रकारे करीत होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप मोठया प्रमाणात दरी निर्माण झाली. या दरीतील अंतर कमी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी विशेष प्रयत्न केले. त्या दोघांना बराच वेळ समुपदेशन केले. समुपदेशन करीत असताना त्यांना भविष्यातील येणार्या अडचणींबद्दल सविस्तरपणे विश्लेषण केले. होणारा अनर्थ टाळण्यासाठी मध्यस्थी ही केंव्हाही चांगली आहे. मध्यस्थीमुळे दोघांमधील वाद मिटून त्यांचे प्रेमात रुपांतर झाले. अशा प्रकारे ऐन दिवाळी सणांमध्ये पतीने पत्नीला नांदवण्यास घेवून जाण्याचे ठरि त्यामुळे दोन्हीही कुटुंबात दिवाळीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व दिवाळी गोड झाली.
घटस्फोटासाठी आलेल्या पतीने पत्नीला नांदवण्यास घेवून जाणे ही खूप मोठी आणि कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन सचिव जोशी यांनी केले. सदरचे मध्यस्थी प्रकरण यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवाचे अधिक्षक एस. ए. जी. नदाफ, विजय माळवदकर, अर्जदाराचे विधिज्ञ एस. आर. राजमाने, सामनेवालीचे विधिज्ञ मनोज गिरी यांनीही विशेष प्रयत्न केले.




More Stories
धाब्यावर धाडसत्र सुरुच सोरेगाव परिसरातील धाब्यावर धाड
शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रथम प्रदर्शित
टेंभुर्णी शहरानजीक अनोळखी पुरुषाचा खुन केले प्रकरणी आईसह चार जणांना केली अटक