आमली पदार्थ शरीराला घातक – पेण पोलिसांकडून जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन
मराठी सारांश
पेण पोलीस ठाण्याच्यावतीने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलिस अधिकारी, अंमलदार, शिक्षक, पत्रकार, आणि 100 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.
English Summary
On the occasion of World Anti-Drug Day (June 26), Pen Police Station organized a rally to raise awareness against drug abuse. The rally involved police officers, teachers, journalists, and over 100 students from various schools and colleges in Pen.
सविस्तर माहिती
२६ जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करताना पेण पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजता पोलीस अधिकारी, अंमलदार, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासमवेत अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली.
त्यानंतर पेण पोलीस ठाण्यातून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीचा मार्ग असा होता –
भगवानदास चौक – कवढाळ तळे – रा.का. पाटील चौक – राजू पोटे मार्ग – नगरपालिका नाका – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – पुन्हा पेण पोलीस ठाणे.
या रॅलीत सार्वजनिक कॉलेज, प्रायव्हेट हायस्कूल, कन्या शाळा आणि भाऊसाहेब नेने विद्यालयातील एकूण १०३ विद्यार्थी, तसेच पोनि संदीप बागुल, सपोनि निलेश राजपूत, पोसई विक्रम नवरखेडे, पोसई संतोष चव्हाण, मपोसई शिल्पा वेगुर्लेकर आणि १५ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
शिक्षक, पत्रकार संघ व शांतता कमिटी सदस्यांनी देखील उपक्रमात सहभाग घेतला.
रॅलीमधून “अंमली पदार्थ हे शरीरासाठी घातक आहेत, त्यापासून दूर राहा” असा संदेश देण्यात आला.