रायगड

तळा पोलिसांकडून चोरीतील मुद्देमाल ओळख पटविण्याचे आवाहन

मराठी सारांश

तळा पोलिसांनी चोरीस गेलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंबाबत नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. २०१४ मध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी निर्दोष मुक्त झाले असले तरी, त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल तळा पोलीस ठाण्यात जमा आहे.

English Summary

Tala Police have urged citizens to identify stolen gold and silver items recovered from a 2014 theft case. Although the accused have been acquitted, the seized valuables remain in police custody. Citizens can contact Tala Police Station for identification.


चोरीस गेलेल्या दागिन्यांसाठी नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा

तळा पोलीस ठाणे येथे गु.र.न. ३०/२०१४, कलम ३९२, ३४ अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, माणगाव न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. मात्र, पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या वस्तूंपैकी १५ सोन्याच्या व २६ चांदीच्या वस्तू तळा पोलीस ठाण्यात जमा आहेत.

आपली वस्तू ओळखण्यासाठी संपर्क करा

ज्या नागरिकांच्या सोन्या-चांदीच्या वस्तू चोरीस गेल्या असतील त्यांनी तळा पोलीस ठाण्यात जाऊन त्यांची ओळख पटवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button