रायगड

रायगड जिल्ह्यात स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारणीला वेग

 रायगड

मराठी सारांश

स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारणीसाठी जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शासकीय इमारतींमध्ये अद्याप हिरकणी कक्ष उपलब्ध नाही, तिथे तात्काळ स्थापना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.

English Summary

Dedicated ‘Hirakani Rooms’ for breastfeeding mothers are being rapidly implemented in Raigad district. District Collector Kishan Jawale has directed immediate establishment in all government buildings where such facilities are not yet available.


रायगड

‘हिरकणी कक्ष’ उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

स्तनदा मातांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष उपलब्ध असावा, या सरकारी धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले असून, लवकरात लवकर ही सुविधा कार्यान्वित करण्यावर भर दिला जात आहे.

2012 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी

स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचा निर्णय 2012 साली शासनाने घेतला होता. भारतीय स्तनपान प्रसारक मंडळाच्या महाराष्ट्र शाखेने या सुविधेची शिफारस केली होती. त्यानुसार, प्रत्येक हिरकणी कक्षात 60X60 ची स्वतंत्र खोली असावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पलंग, गादी, चांगले बेडशीट, तक्के-उशा, पंखा आणि भिंतीवर स्तनपानाच्या महत्त्वाची सचित्र माहिती असावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार

रायगड जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी आणि शासकीय कार्यालयांमध्ये ही सुविधा कार्यान्वित केली जात आहे. ज्या इमारतींमध्ये अद्याप हिरकणी कक्ष नाहीत, तिथे तातडीने उभारणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button