महाराष्ट्र

पेण तालुक्यातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी – तहसीलदारांनी केली सतर्कतेची सूचना

पेण                 पेण

मराठी सारांश

पेण तालुक्यातील मृग नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. भोगावती, निगडे आणि बाळगंगा नदीच्या पाण्याने खाडी व नदीकिनाऱ्यावरील गावांमध्ये पूरस्थितीचा धोका निर्माण केला आहे. तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


English Summary

Heavy rainfall at the end of the Mrig Nakshatra has led to rising water levels in Pen taluka’s rivers, crossing danger marks. Bhogavati, Nigade, and Balganga rivers are overflowing, posing flood threats to nearby villages. Tehsildar Tanaji Shejal has urged riverside residents to remain alert.


सविस्तर माहिती 

पेण तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाने थैमान घातले आहे. मृग नक्षत्राचा शेवट “कोल्हेकुई” करत गेला आणि त्या बरोबरच पावसाचा जोर अधिकच वाढला.

भोगावती नदी दुथडी भरून वाहत असून भुंड्यापुलाजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या पातळीपर्यंत पाणी पोहोचण्याची वेळ आली आहे. अंतोरे गावाजवळ पाणी झपाट्याने वाढत आहे.

निगडे नदी धोक्याची पातळी ओलांडत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, बाळगंगा नदीच्या प्रवाहामुळे खरोशी आणि आसपासच्या गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी खाडी आणि नदी किनाऱ्यावरील गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यासोबत स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button