पेण बँक प्रकरणी ठेवीदारांच्या न्याय हक्कासाठी सर्वोच्य प्रयत्न करणार – बाबासाहेब पाटील
मराठी सारांश
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे बुडालेले पैसे परत मिळण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्य प्रयत्न करणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत ठेवीदारांच्या हक्कांसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.
English Summary
Maharashtra‘s Cooperative Minister, Babasaheb Patil, assured that the government would make every effort to return the lost deposits of Pen Urban Bank’s account holders. In a meeting initiated by MLA Mahendra Thorve, officials discussed immediate solutions for depositors’ rights.
ठेवीदारांना सर्वोच्य प्राधान्य – सहकार मंत्री
राज्य सरकार पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या बाजूने असून त्यांचे बुडालेले पैसे परत मिळावेत यासाठी सर्वोच्य प्राधान्य दिले जाईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
ठेवीदारांच्या न्यायासाठी सरकार सकारात्मक
या बैठकीत कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांनी ठेवीदारांच्या न्यायासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणात सरकारकडून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली.
बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या बैठकीस सहकार आयुक्त दीपक तावरे, अप्पर निबंधक कोथिंबीर, खोपोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, संघर्ष समितीचे अध्यक्ष शिरीष भिवरे आणि इतर सदस्य उपस्थित होते.